तलाव ठेक्याची रक्कम भरण्यास मे अखेरपर्यंत मुदतवाढ

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई -कोरोना प्रादुर्भाव काळात आर्थिक झळ सहन कराव्या लागलेल्या राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने मासेमारीकरिता ठेक्याने देण्यात आलेल्या तलाव, जलाशयांची  वार्षिक तलाव ठेका रक्कम भरणा करण्यासाठी ३१ मे २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच २०२१-२२  तलाव ठेक्याची रक्कम माफ करण्याचा  प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेसाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्यावेळी  राज्यात घोषित टाळेबंदीमुळे राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना पूर्ण क्षमतेनुसार मासेमारी करता आली नाही, तसेच उत्पादित मासळीची विक्री करण्यास पुरेसा वाव न मिळाल्यामुळे मच्छिमारांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले असल्याचे मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्यातील मासेमारीकरिता ठेक्याने देण्यात आलेल्या तलाव आणि जलाशयांची चालू वर्ष सन २०२१-२२ ची वार्षिक तलाव ठेका रक्कम भरणा करण्यासाठी  ३१ मे २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे मंत्री शेख यांनी सांगितले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web