नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई – मुंबईतील भायखळा रेल्वे स्थानक, जिथून दीडशे वर्षांपूर्वी देशातील पहिली रेल्वे धावली होती, ते मूळ प्राचीन, वारसा, स्थापत्य वैभवात परत आले आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नूतनीकरण केलेल्या रेल्वे स्थानकाचे विधीवत उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी जाहीर केले की, रेल्वे बोर्डाने मुंबईतील वातानुकूलित उपनगरीय गाड्यांच्या एकेरी तिकीट दरात जवळपास 50 टक्के कपात करण्यास मान्यता दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, दरकपात लागू झाल्यानंतर 135/- रुपयांचे तिकीट 65/- रुपयांना (25 किमी अंतरासाठी), 205/- रुपयांचे तिकीट 100/-रुपयांना (50 किमी अंतरासाठी) आणि अशाप्रकारे पुढील अंतरासाठी असेल.

नूतनीकरणाच्या कामांदरम्यान स्थानकावर सापडलेल्या मूळ कलाकृती जतन करण्यात आल्या. साइटवर आणि सागवान लाकडाच्या पॅनेलिंगच्या स्टँडवर सापडलेल्या ऐतिहासिक पेंट स्क्रॅप्सनुसार ग्रिल आता रंगविले गेले आहे आणि टिंटेड ग्लास फॅनलाइटसह एक मोठी तिकीट खिडकी तयार केली आहे.
दर्शनी भागाच्या नूतनीकरणात बेसाल्ट दगडाच्या दर्शनी भागाची साफसफाई, दरवाजे, खिडक्या, ग्रील्स आणि गेट्स यांसारख्या मूळ रचनांच्या नूतनीकरणाचा समावेश होतो. इमारती लाकडाचे छप्पर, मंगलोर टाइल्स आणि दर्शनी भागाच्या बाजूने लहान झुकते छत पुनर्स्थापित केले आहे. स्थानकात सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी रॅम्प, पायऱ्या इत्यादी वाढवण्यात आल्या आहेत