५७ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची प्राथमिक फेरीची नामांकने तसेच तांत्रिक पुरस्कार घोषित

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई – मराठी चित्रपट व्यवसायाला मदत करण्याच्या उद्देशाने शासनाने 1962 पासून चित्रपट महोत्सवाच्या आयोजनाला सुरवात केली आहे. मराठी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता तसेच चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन इत्यादी अष्टपैलू गुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांना उत्तेजन देण्याच्या हेतूने प्रतिवर्षी मराठी चित्रपट महोत्सवाचे भव्य स्वरुपात आयोजित करण्यात येते.

57 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील प्राथमिक फेरीच्या तीन-तीन नामांकनांची शिफारस तसेच 7 तांत्रिक पुरस्कार व बालकलाकाराचे एक अशी आठ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत.

अंतिम फेरीसाठी  पांघरुणताजमालआनंदी गोपाळबाय (Y), बार्डोप्रवासमिस यु मिस्टर,बस्तास्माईल प्लीजबाबा या दहा चित्रपटांचे सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकांसाठी नामांकन झाले आहे.  प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती करिता माईघाटमनफकिराझॉलीवूड या तीन चित्रपटांचे आणि प्रथम पदार्पण दिग्दर्शनासाठी घोडावेगळी वाटआटपाडी नाईटस् यांचे नामांकन घोषित करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षात चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले नव्हते.  दि. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2019 या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण 89 मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका 57 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत दाखल झाल्या होत्या. त्या सर्व चित्रपटांचे प्राथमिक फेरीसाठी परीक्षक म्हणून रमेश साळगांवकर, अरुण म्हात्रे, किशू पाल,  श्रीरंग आरस, प्रशांत पाताडे, विजय कदम,  मनोहर आचरेकर, जयवंत राऊत, प्रदीप पेडणेकर, नंदू वर्दम,  प्रकाश जाधव, रमेश मोरे, कुमार सोहनी आणि  दिलीप ठाकूर यांनी काम पाहिले.

घोषित पुरस्कारांव्यतिरिक्त नामांकन लाभलेल्या पुरस्कारासाठी अंतिम फेरीच्या तज्ज्ञ परीक्षक मंडळाकडून संबंधित चित्रपटांचे परीक्षण केले जाणार असून हे पुरस्कार चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत मे 2022 मध्ये समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतील. पुरस्कार तसेच नामांकन प्राप्त सर्व कलाकार, तंत्रज्ञांचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.

57 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव 2019

अंतिम घोषित पारितोषिके

तांत्रिक विभाग  बालकलाकार

अ.क्र.विभागपारितोषिक प्राप्त नावचित्रपट
1उत्कृष्ट कला दिग्दर्शनकै.साहेबमामा ऊर्फ फत्तेलाल पारितोषिक रु. 50,000/- व मानचिन्हश्री. सुनील निगवेकरश्री. निलेश वाघआनंदी गोपाळ
2उत्कृष्ट छायालेखनकै. पांडूरंग नाईक पारितोषिकरु. 50,000/- व मानचिन्हश्री. करण बी. रावतपांघरुण
3उत्कृष्ट संकलनरु. 50,000/- व मानचिन्हश्री. आशिष म्हात्रेश्रीमती. अपूर्वा मोतीवालेबस्ता
4उत्कृष्ट ध्वनीमुद्रणरु. 50,000/- व मानचिन्हश्री. अनुप देवमाईघाट
5उत्कृष्ट ध्वनीसंयोजनरु. 50,000/- व मानचिन्हश्री. मंदार कमलापूरकरत्रिज्या
6उत्कृष्ट वेशभूषारु. 50,000/- व मानचिन्हश्री. विक्रम फडणीसस्माईल प्लीज
7उत्कृष्ट रंगभूषारु. 50,000/- व मानचिन्हश्रीमती. सानिका गाडगीळफत्तेशिकस्त
8उत्कृष्ट बालकलाकारकै. गजानन जहागिरदार पुरस्कार आणिरु. 50,000/- व मानचिन्हश्री. आर्यन मेघजीबाबा

57 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव 2019

नामनिर्देशन

अ.क्र.विभागनामनिर्देशनचित्रपट
1.सर्वोत्कृष्ट कथाकै.मधुसूदन कालेलकरपारितोषिक रु.50,000/- व मानचिन्ह1.    बा.भ. बोरकरपांघरुण
2.   मनीष सिंगबाबा
3.   पुंडलिक धुमाळपेन्शन
2.उत्कृष्ट पटकथापारितोषिक रु.50,000/- व मानचिन्ह1.    नियाज मुजावरताजमाल
2.   समीर आशा पाटीलबोन्साय
3.   विक्रम फडणीसइरावती कर्णिकस्माईल प्लीज
3.उत्कृष्ट संवादकै.आचार्य अत्रे पारितोषिकरु.50,000/- व मानचिन्ह1.    इरावती कर्णिकआंनदी गोपाळ
2.   श्वेता पेंडसेबार्डो
3.   नियाज मुजावरताजमाल
4.उत्कृष्ट गीतेकै.माडगूळकर पारितोषिकरु.50,000/- व मानचिन्ह1.गीत-आभाळासंग मातीचं नांदणंसंजय कृष्णाजी पाटीलहिरकणी
2.गीत- रान पेटलंश्वेता पेंडसेबार्डो
3.गीत- ही अनोखी गाठवैभव जोशीपांघरुण
5.उत्कृष्ट संगीतकै.अरुण पौडवालपारितोषिकरु.50,000/- व मानचिन्ह1.    ऋषिकेश-जसराज- सौरभआनंदी गोपाळ
2.   रोहन रोहमस्माईल प्लीज
3.   अमित राजहिरकणी
6.उत्कृष्ट पार्श्वसंगीतरु.50,000/- व मानचिन्ह1.    सौरभ भालेरावआनंदी गोपाळ
2.   प्रफुल्ल स्वप्नीलस्माईल प्लीज
3.   हितेश मोडकपांघरुण
7.उत्कृष्ट पार्श्वगायकरु.50,000/- व मानचिन्ह1.    गीत-मम पाऊलीऋषिकेश रानडेआनंदी गोपाळ
2.   गीत-येशील तूसोनू निगममिस यु मिस्टर
3.   गीत- गार गार थेटरातजसराज जोशीगर्लफ्रेंड
8.उत्कृष्ट पार्श्वगायिकारु.50,000/- व मानचिन्ह1.    गीत- मम पाऊलीआनदी जोशीआनंदी गोपाळ
2.   गीत- रान पेटलंसावनी रविंद्रबार्डो
3.   गीत- आभाळसंग मातीचं नांदनमधुरा कुंभारहिरकणी
9.उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शकरु.50,000/- व मानचिन्ह1.    लव स्टोरीराहुल – संजीवगर्लफ्रेंड
2.   परिणीती आसमंतीचिन्नी प्रकाशवन्स मोअर
3.   राज्याभिषेक गीतसुभाष नकाशेहिरकणी
10.उत्कृष्टअभिनेताकै.शाहू मोडक पारितोषिकरु.50,000/- व मानचिन्हश्री शिवाजी गणेशन पुरस्कार1.    कैलास वाघमारेघोडा
2.   दिपक डोब्रियालबाबा
3.   ललित प्रभाकरआनंदी गोपाळ
11.उत्कष्ट अभिनेत्रीकै.स्मिता पाटील पारितोषिक रु.50,000/- व मानचिन्ह1.    भाग्यश्री मिलिंदआनंदी गोपाळ
2.   सोनाली कुलकर्णीपेन्शन
3.   मृण्मयी देशपांडेमिस यु मिस्टर
12.उत्कृष्ट विनोदी अभिनेत्रीकै.रत्नमाला पारितोषिकरु.50,000/- व मानचिन्ह1.         शिफारस नाहीशिफारस नाही
2.         शिफारस नाहीशिफारस नाही
3.        शिफारस नाहीशिफारस नाही
13.उत्कृष्ट विनोदी अभिनेताकै.दामूअण्णा मालवणकर पारितोषिक रु.50,000/- व मानचिन्ह1.    पार्थ भालेरावबस्ता
2. शिफारस नाहीशिफारस नाही
3.शिफारस नाहीशिफारस नाही
14.सहाय्यक अभिनेताकै.चिंतामणराव कोल्हटकर पारितोषिक रु.50,000/- व मानचिन्ह 1.    सुहास पळशीकरबस्ता
2.   रोहित फाळकेपांघरुण
3.   संजय खापरेताजमाल
15.सहाय्यक अभिनेत्रीकै.शांता हुबळीकर व कै.हंसा वाडकर पारितोषिक रु.50,000/- व मानचिन्ह1.    किरण खोजेताजमाल
2.   नंदिता पाटकरबाबा
3.   अंजली पाटीलमन फकिरा
16उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेताकै. काशिनाथ घाणेकर पारितोषिकरु.50,000/- व मानचिन्ह1.   दिपक काळेझॉलीवूड
      2.    शिफारस नाहीशिफारस नाही
       3.   शिफारस नाहीशिफारस नाही
17उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्रीकै.रंजना देशमुख पारितोषिक रु.50,000/- व मानचिन्ह1.    अक्षया गुरवरिवणावायली
2.   अश्विनी लाडेकरझॉलीवूड
3.   अंकिता लांडेगर्ल्स

57 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव

निकालपत्र

अंतिम फेरीकरीता प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती  प्रथम पदार्पण दिग्दर्शन

अंतिम फेरीकरीत प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती
अ.क्र.चित्रपटाचे नावचित्रपट संस्थेचे नाव
1.माईघाटअल्केमी व्हिजन
2.मनफकिराएस.एन.प्रोडक्शन
3.झॉलीवूडविशबेरी ऑनलॉईन सर्विस प्रा.लि
प्रथम पदार्पण दिग्दर्शन
चित्रपटाचे नावदिग्दर्शकाचे नाव
1.घोडाटी.महेश
2.वेगळी वाटअच्युत नारायण
3.आटपाडी नाईटस्नितीन सुपेकर

57 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव

निकालपत्र

अंतिम फेरीकरीता पुढील दहा चित्रपट

अ.क्र.चित्रपटाचे नाव
1पांघरुण
2ताजमाल
3आनंदी गोपाळ
4वाय (Y)
5बार्डो
6प्रवास
7मिस यु मिस्टर
8बस्ता
9स्माईल प्लीज
10बाबा
Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web