लिंग समानता आणि दिव्यांग समावशेकता या विषयावर होणार राष्ट्रीय परिसंवाद

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्‍ली – शहरी विकासामध्ये लिंग समानता आणि दिव्यांग समावेशकता मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने 28 एप्रिल 2022 ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत ‘भारतीय शहरांमध्ये लिंग समानता आणि दिव्यांग समावशेकता’  या विषयावर  3 दिवसीय राष्ट्रीय परीसंवादाचे आयोजन नवी दिल्लीत इंडिया हॅबिटॅट सेंटर इथे केले आहे.  

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (एमओएचयूए) अंतर्गत राष्ट्रीय शहरी संस्थेचा (एनआययूए)  प्रवेशयोग्य, सुरक्षित आणि समावेशी भारतीय शहरे (बीएएसआयआयसी) कार्यक्रम, भारतातील संयुक्त राष्ट्र आणि परराष्ट्र, राष्ट्रकुल आणि विकास कार्यालय (एफसीडीओ), युके यांच्या संयुक्त विद्यमाने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्वांसाठी अधिक लवचिक, सुलभ, सर्वसमावेशक, सुरक्षित आणि शाश्वत असा भारत सुनिश्चित करण्यासाठी शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांच्या अंमलबजावणीमध्ये  लिंग समानता आणि दिव्यांग समावशेकता यांना मुख्य प्रवाहात आणणे हे या तीन दिवसांच्या कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे. दिव्यांग व्यक्तींचे हक्क (आरपीडब्लूडी) कायदा 2016, दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांवरील संयुक्त राष्ट्र करार (यूएनसीआरपीडी), शाश्वत विकासासाठी 2030 जाहीरनामा, नवीन शहरी जाहीरनामा आणि सेंडाई आराखडा भारताच्या महत्त्वाकांक्षी दृष्टीकोनाची कामगिरी पुढे नेण्यासाठी सुलभ, समावेशक, सुरक्षित आणि लवचिक भारत@2047 यांच्या अनुषंगाने शहरी विकासामध्ये लिंग समानता आणि दिव्यांग समावेशकतेबाबत भारताची वचनबद्धता बळकट करणे हे या परिसंवादाचे उद्दिष्ट आहे. 

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे (एमओएचयूए) समर्थित, राष्ट्रीय परिसंवाद,  शहरी पातळीवरील प्रवेशयोग्यता आणि समावेशन आव्हाने, विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी देशभरातील धोरणकर्ते, शैक्षणिक, खाजगी क्षेत्र, तज्ञ आणि अंमलबजावणीकर्ते यांना एकत्र आणेल. यात तांत्रिक कौशल्य आणि ज्ञान सामायिक केले जाईल तसेच शहरी सुलभता आणि समावेशनावर  योगदान दिले जाईल.

संयुक्त राष्ट्राच्या माजी सहाय्यक सरचिटणीस आणि यूएन वुमनच्या माजी उप कार्यकारी संचालक लक्ष्मी पुरी प्रमुख वक्त्या म्हणून बीजभाषण करणार आहेत.

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव मनोज जोशी, डीईपीडब्लूडी, एमओएसजेईचे सहसचिव राजेश शर्मा, भारतातील संयुक्त राष्ट्राचे निवासी समन्वयक शोंबी शार्प, पायाभूत सुविधा आणि नागरी विकास विभागाचे प्रमुख  शंतनू मित्रा, ब्रिटिश हाय आणि एनआययूएचे संचालक हितेश वैद्य हे देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web