अमरावती – देशात वाढत्या पेट्रोल वाढ सह वाढती महागाई विरोधात शहर काँग्रेस सह युवक काँग्रेस वतीने अमरावती मध्ये इर्विन चौकात महागाई जुमला आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी रामदेव बाबाच्या फोटोचे बॅनर त्यावर पतंजली पेट्रोल शॉप असे संबोधून केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या ,
या सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पेट्रोल के दाम कम हुये कि नही हुए महंगाई कम हुई कि नही हुई हि रिकॉर्डिंग लावून यावर सर्व काँग्रेस पदाधिकऱ्यानी नही हुए च्या घोषणा देण्यात आल्या , मोदी हटाव देश बचाव चे नारे देऊन शेकडो काँग्रेस पदाधिकारी सहभागी झाले.