नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – बहरीन येथे झालेल्या सहाव्या आशियाई ज्यू जित्सू अजिंक्यपद स्पर्धेत कल्याणचे रहिवासी असलेल्या नवी मुंबईतील एपीआय अभिजीत मोरे यांनी भारताचे प्रतिनिधीत्व करताना ८५ किलो वजन गटात कांस्यपदक जिंकले.
ज्यू जित्सू इंटरनॅशनल फ़ेडरेशन या महासंघाशी संलग्न असलेल्या ज्यू जित्सू आशियाई युनियनला ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ ऐशियाची मान्यता आहे. तसेच युएसआयपी इंटरनॅशनल पोलिस युनियनने त्याला मान्यता दिलेली आहे. या स्पर्धेत भारतासह बहरीन, चायनीच तैपेई, इंडोनेशिया, इराक, जॉर्डन, मालदीव, कझाकिस्तान, कोरिया, कुवैत, थायलंड, उझबेकिस्तान आणि यूएई अशा २४ देशांतील ३९३ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत ८५ किलो खालील वजन गटात एपीआय अभिजीत मोरे यांनी भारताचे प्रतिनिधीत्व करीत सहभाग घेत कांस्यपदक पटाकावले. २०१५ पासून एपीआय अभिजीत मोरे यांना प्रशिक्षक रत्नादीप्ती मंजिंरी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. अभिजीत मोरे यांना डीजी रजनिश शेठ, एडीजी अनुप कुमार सिंह, पी.आय बाजीराव कलंत्रे, एपीआय जुनैद खान यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. ज्यू जित्सू असोशियेशन ऑफ इंडीआ चे अध्यक्ष सुरेश गोपी, व सचिव विनय कुमार तसेच ज्यू जित्सू असोशियेशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष झियाउद्दिन खतीब यांनी ही संधी दिल्याबद्दल अभिजीत मोरे यांनी आभार व्यक्त केले.
अभिजीत मोरे यांनी राष्ट्रीय स्पर्धेत अनेक सुवर्णपदके जिंकली आहेत. अपराजित खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. तिसरी आशियाई अजिंक्यपद स्पर्धा (२०१७, कझाकिस्तान), वर्ल्ड ज्यू जित्सू अजिंक्यपद स्पर्धा (२०१९, थायलंड), ५ वी आशियाई अजिंक्यपद स्पर्धा ( २०२१, अबु धाबी) या ठिकाणी झालेल्या स्पर्धांमध्ये अभिजीत मोरे यांनी भारतासाठी सुवर्ण व कांन्स पदके जिंकली आहेत. सहाव्या आशियाई ज्यू जित्सू स्पर्धेत अभिजीत मोरे यांनी कांस्यपदक जिंकून २०२२ मध्ये चीन येथे होणाऱ्या एशियन गेम्समधे व २०२३ मध्ये होणाऱ्या ऐशियन इनडोअर व मार्शल आर्ट गेम्स (थायलंड) या दोन स्पर्धांसाठी खेळाडू म्हणून व प्रशिक्षक रत्नदीप्ती मंजिरी हीने भारतीय संघ प्रशिक्षक म्हणून भारतीय संघातील आपले स्थान निश्चित केले आहे.
याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंञी सुनिल केदार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अभिजित मोरे यांचा शाल व श्रीफळ देउन सत्कार करताना भविष्यात वाटचाल करण्यासाठी शुभेच्छा देउन मदत करण्याचे आश्वासन दिले.