केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाकडून ११ ते १७ एप्रिलला आयकॉनिक वीक साजरा होणार

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त  11 एप्रिल ते 17 एप्रिल 2022 या काळात केंद्रीय पंचायती राज मंत्रालय लोकसहभागाच्या प्रेरणेसह एक लोकउत्सव म्हणून आयकॉनिक वीक साजरा करणार आहे. “संपूर्णतः समाज” आणि “संपूर्णतः सरकार”या दृष्टीकोनासह हा स्मरणीय प्रसंग योग्य प्रेरणेने साजरा करण्यासाठी केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने ‘पंचायतींच्या नवनिर्माणाचा संकल्पोत्सव’ या संकल्पनेवर आधारित विविध विषयवार परिषदांच्या संकल्पनात्मक मालिकेचे आयोजन केले आहे. पंचायती राज संस्थांच्या माध्यमातून शाश्वत विकास ध्येयांच्या स्थानिकीकरणासंदर्भात सर्व भागधारकांचे दृष्टीकोन, कल्पना, मते,सज्जता, तंत्रज्ञान विषयक हस्तक्षेप, उत्तमोत्तम पद्धती आणि अत्याधुनिक अंतर्विचार यांचे एकत्रित सादरीकरण व्हावे म्हणून या परिषदा आयोजित करण्यात आल्या आहेत.

आठवडाभर चालणाऱ्या या अविस्मरणीय कार्यक्रमांची सुरुवात 11 एप्रिल 2022 रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात शाश्वत विकास ध्येयांच्या स्थानिकीकरणासंदर्भातील राष्ट्रीय भागधारक परिषदेच्या आयोजनाने होईल. या परिषदेचे प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या  नायडू उपस्थित राहणार असल्यामुळे या कार्यक्रमाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या उद्घाटनपर सत्रात उपराष्ट्रपती शाश्वत विकास ध्येयांच्या स्थानिकीकरणाचा ‘लोगो’  जारी करतील तसेच ते शाश्वत विकास ध्येयांच्या स्थानिकीकरणाच्या कार्यान्वयनाबाबत राज्यांना दिल्या जाणाऱ्या संयुक्त सूचनांचे संकलन आणि ग्रामपंचायतींच्या वापरासाठी संकल्पनात्मक सादरीकरणाचे संकलनदेखील जारी करतील.

सात दिवस होणाऱ्या संकल्पनांवर आधारित परिषदांचे तपशील खाली दिले आहेत:                  

l. No. Date / Day National Conference
1. 11th April 2022 (Monday) National Stakeholders Conference on Localisation of Sustainable Development Goals
2. 12th April 2022 (Tuesday) National Conference on Good Governance
3. 13th April 2022 (Wednesday) National Conference on Localisation of SDGs on Child Friendly Village and Engendering Development for Gender Equality in Villages.
4. 14th April 2022 (Thursday) National Conference on Augmentation of Own Source Revenues of Rural Local Bodies
5. 15th April 2022 (Friday) National Conference on Localisation of SDGs on  Healthy Village and Socially Secured Village.
6. 16th April 2022 (Saturday) National Conference on Localisation of SDGs on Water Sufficient Village and Clean and Green Village.
7. 17th April 2022 (Sunday) National Conference on Localisation of SDGs on Poverty Free and Enhanced Livelihoods Village and Self Sufficient Infrastructure in Village

राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमासोबतच या विशेष सप्ताहादरम्यान (11 ते 17 एप्रिल2022) पंचायतीच्या बैठका आयोजित करण्याच्या सूचना राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत. या बैठकांमध्ये आधी निश्चित केलेल्या 9 शाश्वत विकास ध्येयांविषयी चर्चा करण्यावर अधिक भर देण्याचा तसेच 2022-23 या वर्षामध्ये यातील एक किंवा अधिक संकल्पनांचा स्वीकार करण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

स्वातंत्र्याच्या  अमृतमहोत्सव साजरा करण्याच्या अधिकृत कार्यक्रमाला  12 मार्च 2021 रोजी सुरुवात झाल्यापासून  केंद्रीय पंचायती राज मंत्रालय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाबद्दल ग्रामीण जनतेमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. ग्राम पंचायतींनी या संदर्भात हाती घेतलेल्या उपक्रमांच्या आणि कार्यक्रमांच्या प्रगतीची माहिती देण्यासाठी  https://IndiaAt75.nic.in/ या ऑनलाईन समर्पित माहितीफलकाची निर्मिती करण्यात आली असून या उपरोल्लेखित India@75 माहितीफलकावर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासंदर्भातील छायाचित्रे, व्हिडिओ, छोट्या बातम्या इत्यादी संबंधित साहित्य अपलोड केले जात आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web