१८ कोटीचे बनावट इनपूट टॅक्स क्रेडीट्सचे रॅकेट उघड, दक्षिण मुंबई सीजीएसटी आयुक्तालयाची कारवाई

नेशन न्युज मराठी टिम.

मुंबई – दक्षिण मुंबई सीजीएसटी आयुक्तालयाच्या अँटी-इव्हेशन युनिटने बनावट इनपूट टॅक्स क्रेडिड (ITC) रॅकेट उद्ध्वस्त केले आहे आणि मेसर्स स्टॅलोन ओव्हरसीजच्या मालकाला अटक केली आहे. ही फर्म रु. 18 कोटीचे बनावट GST इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवण्यात आणि मंजूर करत होती. 98 कोटी रुपयांच्या बोगस पावत्यांचा यासाठी वापर केला होता.

सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स (CGST) मुंबई झोनच्या सेंट्रल इंटेलिजेंस युनिटच्या टिपच्या आधारे, मुंबई दक्षिण CGST आयुक्तालयाच्या अँटी-इव्हेशन विंगच्या टीमने तपास सुरू केला, ज्यामुळे या फर्मने बनावट आयटीसीचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. 14 पेक्षा जास्त अस्तित्वात नसलेल्या कंपन्या/संस्थांनी जारी केलेल्या बोगस पावत्यांवर आणि हे बनावट ITC इतर कंपन्यांना दिले.

सीजीएसटी कायद्याच्या कलम 69 अन्वये 06.04.2022 रोजी आरोपीला CGST कायद्याच्या कलम 132(5) सह कलम 132(1)(b), 132(1)(c) नुसार गुन्हा केल्याबद्दल अटक करण्यात आली. त्याला 06.04.2022 रोजी मुंबईच्या अतिरिक्त सीएमएम कोर्टात हजर करण्यात आले. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

हे प्रकरण सीजीएसटी, मुंबई झोनने कर चुकविणाऱ्यांविरुद्ध सुरू केलेल्या अँटी-इव्हेशन मोहिमेचा एक भाग आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून सीजीएसटी मुंबई दक्षिण आयुक्तालयाने सुमारे 642 कोटी रुपयांची करचोरी शोधून काढली आहे. सुमारे 10.89 कोटी रुपये रिकवर केले आहेत आणि गेल्या सात महिन्यांत 8 जणांना अटक केली आहे. सीजीएसटी विभाग संभाव्य करचोरी करणार्‍यांची ओळख पटविण्यासाठी डेटा विश्लेषण आणि नेटवर्क विश्लेषण साधने वापरत आहे आणि कर चुकवणार्‍यांना पकडण्यासाठी इतर कर प्राधिकरणांशी समन्वय साधत आहे. आगामी काळात विभागाकडून ही चोरीविरोधी मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. 

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web