नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – टिटवाळा बाजारपेठेत विविध सोन्याचे बनविलेले दागिने विक्रीसाठी आणलेल्या मुंबईतील सराफाला दोन अज्ञात चोरट्यांनी सव्वा कोटी रुपयांना लुटण्याची घटना घडली असून बाजारपेठेत या घटनेने सोने-चांदी विक्री दुकानदारांना मध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई लालबाग विभागातून सोन्याचे व्यापारी राकेश अंबालाल जैन हे आपल्या ड्रायव्हर सह फोर व्हीलर गाडीने टिटवाळा बाजारपेठेत बनविलेले सोने व्यापाऱ्यांना देण्यासाठी दुपारी आले होते. टिटवाळयातील रेंजन्सी जवळील एका हॉटेलला आपली फोर व्हीलर कार उभी करून ठेवली होती. काही बनविलेले सोने एका व्यापाऱ्याला दिल्यानंतर आपल्या गाडीत येऊन बसले मात्र पुढचे टायर पंचर असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने दोघेही गाडी बाहेर पडले.
याच दरम्यान दोन अज्ञात चोरट्यांनी मोटरसायकलवर येत गाडीत ठेवलेली सोन्याची बॅग घेत सुसाट निघून गेले. या बॅगेत बावीसशे ग्राम सोने व इतर सोने मिळून सव्वा कोटी रुपयांचे सोने चोरट्यांनी मोठ्या शिताफीने पळवून नेले. याबाबत टिटवाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत.