सबऑर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशनचा महावितरण अधीक्षक अभियंत्याच्या दालना बाहेर ठिय्या

नेशन न्यूज मराठी टीम.

नांदेड -महावितरण कार्यालयातील कार्यरत असलेल्या सहाय्यक अभियंता वैष्णवी मेश्राम यांचे निलंबन अन्यायकारक असल्याचा आरोप करीत इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने अधीक्षक अभियंता यांच्या दालनासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले .महावितरण विभागाच्या नांदेड शहर कार्यालयात कार्यरत असलेल्या महिला सहाय्यक अभियंता वैष्णवी मेश्राम यांचे निलंबन करण्यात आले आहे सदर निलंबन नियमांना धरून नसल्याचे आरोप सबऑर्डीनेट इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. संघटनेचे प्रादेशिक समन्वयक जनार्दन चौधरी व राजकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंता यांच्या दालना बाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

सबऑर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशन यांच्या सहाय्यक अभियंता वैष्णवी मेश्राम यांनी वैद्यकीय कारणास्तव रजेचा अर्ज सादर केला होता परंतु सदर रजा मंजूर न करता त्यांचे वेतन कपात करण्याचे आदेश काढून खुलासा देण्याच्या सात दिवसाच्या मुदतीच्या आतच त्यांचे निलंबन करण्यात आले आहे . असा आरोप संघटनने केला आहे.या नियमबाह्य निलंबनाच्या विरोधात इंजिनिअर्स असोसिएशन अधीक्षक अभियंता कार्यालय अधीक्षक अभियंता यांच्या दालनासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आलंय जो पर्यंत वैष्णवी मेश्राम ला कामावर रुजू करून घेण्यात येणार नाही तो पर्यंत ठिय्या आंदोलन सुरू असणार असल्याची प्रतिक्रिया या आंदोलन कर्त्यांनी दिलीय. आहे. अधीक्षक यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आसता तो होऊ शकला नाही.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web