गुढीपाडव्याच्या मुर्हतावर कल्याण डोंबिवली मनपा शाळांमध्ये प्रवेशोत्सवाचे आयोजन

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, यांच्या संकल्पनेतून, शिक्षण उप आयुक्त अनंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ०२ रोजी  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्व मनपा शाळांमध्ये दाखलपात्र व शाळाबाह्य विद्याथ्यांसाठी प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक यांनी त्यांच्या शाळा परिसरात दाखलपात्र मुलांचे सर्वेक्षण केले असून सर्वेक्षणानुसार दाखलपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे शाळेमार्फत पुष्प देऊन स्वागत केले जाणार आहे. या कार्यक्रमाची सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी पूर्वतयारी करुन शाळा परिसरात शालेय प्रवेशाबाबत वातावरण निर्मिती केलेली आहे.

हा कार्यक्रम सकाळी ९ ते ११ या वेळेत महानगरपालिकेच्या सर्व मनपा शाळांमध्ये एकाच वेळी आयोजित करण्यात आलेला असून प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळेत शिक्षण विभागातील अधिकारी तसेच महानगरपालिकेचे सर्व खातेप्रमुख, विभाग प्रमुख विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, हे स्वत: विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी महात्मा फुले प्राथमिक विद्यालय मनपा शा.क्र. ६८ बारावे. कल्याण (प) येथे उपस्थित राहणार आहेत.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, कार्यक्रम अधिकारी आणि सर्व पर्यवेक्षणीय यंत्रणा प्रयत्न करीत असल्याची माहिती शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी जे. जे. तडवी यांनी दिली

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web