देशातील ३७ छावणी रुग्णालयांमध्ये १ मे पासून आयुर्वेदिक उपचार केंद्रे सुरु

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली – पारंपारिक भारतीय आयुर्वेदिक औषधउपचार पद्धतीचा लाभ अधिकाधिक रुग्णांना मिळवून देण्याच्या उद्देशाने संरक्षण मंत्रालयाने 1 मे 2022 पासून देशभरातील 37 छावणी रुग्णालयांमध्ये आयुर्वेदिक उपचार केंद्रे कार्यान्वित  करण्याचा निर्णय घेतला आहे.


संरक्षण सचिव डॉ.अजय कुमार आणि केंद्रीय आयुष मंत्रालय सचिव वैद्य राकेश कोटेचा यांच्यामध्ये नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे संरक्षण दलांतील कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय तसेच छावणी परिसरातील निवासी यांच्यासह छावणी रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा लाभ घेणाऱ्या इतर सामान्य नागरिकांना आयुर्वेदातील प्रस्थापित आणि काळाच्या कसोटीवर सिध्द झालेल्या उपचार पद्धती उपलब्ध होणार आहेत.


या उपक्रमाला आयुष मंत्रालय पाठबळ पुरविणार असून  या 37 रुग्णालयांसाठी कुशल आयुष डॉक्टर्स आणि फार्मासिस्ट यांची नेमणूक केली जाणार आहे. या 37 आयुर्वेदिक उपचार केद्रांमध्ये प्रत्यक्ष काम सुरु करण्यासाठी संरक्षण मालमत्ता महासंचालनालय, संरक्षण मंत्रालय आणि केंद्रीय आयुष मंत्रालय एकमेकांच्या सहकार्याने समन्वय साधून आवश्यक कार्य करतील असा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला.


या निर्णयाचा लाभ महाराष्ट्राला देखील होणार असून राज्यातील खडकी तसेच देहूरोड या दोन छावणी रुग्णालयांमध्ये सुरु होणाऱ्या आयुर्वेदिक उपचार केंद्रांचा या 37 केंद्रांमध्ये समावेश आहे.


देशभरातील ज्या छावणी रुग्णालयांमध्ये आयुर्वेदिक उपचार केंद्रे सुरु होणार आहेत त्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:

List of 37 Cantonment Board Hospitals to operationalise Ayurveda Centres
1Agra
2Allahabad
3Bareilly
4Dehradun
5Mhow
6Pachmarhi
7Shahjahanpur
8Jabalpur
9Badami Bagh
10Barrackpore
11Ahmedabad
12Dehuroad
13Khadki
14Secunderabad
15Dagshai
16Ferozepur
17Jalandhar
18Jammu
19Jutogh
20Kasauli
21Khasyol
22Subathu
23Jhansi
24Babina
25Roorkee
26Danapur
27Kamptee
28Ranikhet
29Lansdowne
30Ramgarh
31Mathura
32Belgaum
33Morar
34Wellington
35Amritsar
36Bakloh
37Dalhousie
Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web