नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज हायड्रोजन आधारित फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेईकल (FCEV) मधून संसदेत आगमन केले. ‘ग्रीन हायड्रोजन’ ने चालवलेल्या गाडीचे प्रात्यक्षिक करून, नितीन गडकरी यांनी हायड्रोजन, फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेईकल (FCEV) तंत्रज्ञान आणि भारतासाठी हायड्रोजन-आधारित सामुदायिकतेला समर्थन देण्यासाठी, त्याच्या लाभांविषयी जनजागृती करण्याच्या आवश्यकतेचे समर्थन केले.
ग्रीन हायड्रोजन भारतात तयार केले जाईल, देशात शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी ग्रीन हायड्रोजन पुनर्भरण स्थानकांची स्थापना केली जाईल, असे आश्वासन यावेळी गडकरींनी दिले. ते म्हणाले, की भारत लवकरच ग्रीन हायड्रोजन निर्यात करणारा देश होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतात स्वच्छ ऊर्जा आणि अत्याधुनिक गतिशीलता यांच्या संकल्पनेला अनुसरून सरकार ‘नॅशनल हायड्रोजन मिशन’च्या माध्यमातून हरित आणि स्वच्छ ऊर्जेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे गडकरी म्हणाले.