नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली – संरक्षण मंत्रालयाने गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) सोबत भारतीय तटरक्षक दलासाठी एकूण रु. 473 कोटी खर्चाच्या आठ जलद गस्ती नौकांच्या बांधकामाच्या एका करारावर स्वाक्षरी केली आहे. 28 मार्च 2022 रोजी नवी दिल्ली येथे संयुक्त सचिव (मेरीटाईम आणि सिस्टीम्स) श्री दिनेश कुमार आणि गोवा शिपयार्ड लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, (Cmde ) बी बी नागपाल (निवृत्त) यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
या जहाजांचे प्लॅटफॉर्म पृष्ठभाग(इंडियन-IDDM) या श्रेणी अंतर्गत जीएसएलद्वारे स्वदेशी बनावटीने डिझाइन, विकसित आणि उत्पादित केले जातील. या आठ वेगवान गस्ती नौका भारताच्या किनारपट्टीवर तैनात असतील आणि त्यात उथळ पाण्यात काम करण्याची क्षमता आणि त्विशाल किनारपट्टीवरील सुरक्षा यंत्रणा वाढवण्याची क्षमता असेल.
यामुळे‘आत्मनिर्भर भारत’ चे उद्दिष्ट पूर्ण होऊन, स्वदेशी नौकाबांधणी क्षमतेला चालना मिळेल आणि या क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढतील. भारताला संरक्षण उत्पादन केंद्र बनवण्याच्या सरकारच्या संकल्पाला या करारामुळेआणखी चालना मिळेल ज्यायोगे केवळ देशांतर्गत गरजाच नव्हे तर निर्यात बाजारपेठ मिळविण्याचे उद्दिष्ट देखील साध्य होईल.