खबरदार,अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला दिल्यास पालकांवर पोलिसांची कारवाई

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

डोंबिवली – १८ वर्षाखालील मुलांना वाहन चालवायला दिल्याने डोंबिवलीतील पालकांना थेट कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
डोंबिवलीत शहर वाहतुक नियमांचे उलघणं करणाऱ्यावर वाहतूक नियंत्रण विभागाकडून सतत कारवाई केली जात आहे. त्यातच आता १८ वर्षाखालील मुले सरार्सपणे वाहन चालवताना आढळून येत आहेत. त्यामुळे वाहतुक नियंत्रण विभागाच्या पोलिसांनी या मुलांच्या पालकांना संपर्क साधत थेट वाहतूक विभागाच्या कार्यालयात बोलवून घेत त्यांच्या पाल्याने केलेल्या वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच हजार ते दहा हजारापर्यंत दंड पालकांकडून आकारण्यात आला आहे.

तसेच त्याचवेळी त्यांचे समुपदेशन देखील केले जात आहे.आणि जे कोणी पालक आपल्या १८ वर्षाखालील मुलांना वाहन चालवण्यासाठी देत असतील तर त्यांना यापुढील कारवाईसाठी सामोरे जावे लागणार असल्याचे डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्याकडून सांगण्यात आले आहे. याच बरोबर अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देऊ नये आसे आवाहन देखील पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web