नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली – भारत-यूके मुक्त व्यापार करारासाठी (FTA) भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील गुरुवार 17 मार्च 2022 रोजी दुसऱ्या फेरीची चर्चा पूर्ण झाली.
भारतीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने लंडनमध्ये यासंदर्भात तांत्रिक विषयांवर चर्चा केली. यापैकी काही वाटाघाटी या यूकेमधील समर्पित वाटाघाटी केंद्रात प्रत्यक्ष उपस्थितीत तर आणि इतर वाटाघाटी या दुरदृश्य माध्यमाद्वारे अशा आयोजित करण्यात आल्या होत्या.
कराराचा मसुदा मजकूर उभय देशांना आधीच सामाईक करण्यात आला होता आणि ज्याचे लेखी करार बनतील अशा यातील बहुतेक विषयांवर वाटाघाटीच्या या फेरीत चर्चा झाली. 26 धोरण क्षेत्रांचा समावेश असलेल्या 64 स्वतंत्र सत्रांवर चर्चा करण्यासाठी दोन्ही बाजूंचे तंत्रज्ञ एकत्र आले होते.
वाटाघाटीची तिसरी फेरी एप्रिल 2022 मध्ये भारतात आयोजित करण्यात आली आहे.