एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२२ दरम्यान ऊर्जा क्षेत्राद्वारे कोळसा आयातीत २२.७३ मेट्रिक टनांपर्यंत घट

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्‍ली – देशांतर्गत कोळसा उत्पादन वाढवण्यासाठी घेतलेल्या धोरणात्मक उपायांमुळे कोळशाच्या वाढीव उपलब्धतेमुळे, एकूण कोळशाची आयात 2019-20 मधील 248.54 मेट्रिक टनावरून 2020-21 मध्ये 215.25 मेट्रिक टनावर घसरली. तसेच, एप्रिल 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान, कोळशाची आयात 173.32 मेट्रिक टन पातळीपर्यंत खाली आली आहे, जी मागील वर्षीच्या याच कालावधीतील 180.56 मेट्रिक टन होती.

ऊर्जा क्षेत्राद्वारे कोळशाची आयात 2019-20 मधील 69.22 मेट्रिक टन वरून 2020-21 मध्ये 45.47 मेट्रिक टन वर घसरली. तसेच, एप्रिल 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत, ऊर्जा क्षेत्राद्वारे कोळशाची आयात 22.73 मेट्रिक टन च्या पातळीवर कमी झाली आहे जी मागील वर्षाच्या याच कालावधीत 39.01 मेट्रिक टन होती.

कोल इंडिया लिमिटेड द्वारे कोळसा पुरवठ्याचा वाटा, जो 2019-20 मध्ये कोळशाच्या एकूण वापराच्या सुमारे 60.8% होता, तो 2020-21 मध्ये 63.3% आणि पुढे 2021-22 (एप्रिल-जानेवारी 2022) मध्ये 64.3% पर्यंत वाढला.

कोळसा आयातीला पर्यायाच्या उद्देशाने कोळसा मंत्रालयात एक आंतर-मंत्रालयीन समिती (IMC) स्थापन करण्यात आली आहे. ऊर्जा मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, जहाजबांधणी मंत्रालय, वाणिज्य मंत्रालय, पोलाद मंत्रालय, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MSME), उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT), केंद्रीय विद्युत प्राधिकरण (CEA), कोळसा कंपन्या आणि बंदरे यांचे प्रतिनिधी या आंतर मंत्रालयीन समितीचे सदस्य आहेत. ही समिती प्रशासकीय मंत्रालयांसोबत मोठ्या मंचावर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देते जेणेकरुन त्यांना त्यांच्या संबंधित क्षेत्रातील कोळसा ग्राहकांना कोळशाची आयात बंद करायला प्रोत्साहित करण्यासाठी मार्गदर्शन करता येईल. आंतर मंत्रालयीन समितीच्या निर्देशानुसार, कोळसा मंत्रालयाने एक आयात डेटा प्रणाली विकसित केली आहे, ज्यामुळे मंत्रालयाला कोळशाच्या आयातीचा मागोवा घेता येईल.

केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

The details of coal imported by coal based power plants during the last five years and current year is given below:-

  (in Million tonnes)

 YearImported coal based power plantsBlended coal based power plantsTotal coal import by Power Plants
2016-1746.3019.8766.17
2017-1839.3717.0456.41
2018-1940.2921.3761.66
2019-2045.4723.7569.22
2020-2135.0810.3945.47
2021-22 Upto Jan.2216.086.6522.73
Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web