नेशन न्यूज मराठी टीम.
शेवगाव – वंचित बहूजन आघाडी च्या वतीने अमरापुर येथे कोपरे,वडूले खुर्द,आव्हाणे या भागातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांन करिता वंचित बहुजन आघाडी चे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.वंचित बहूजन आघाडीच्या कार्यकरत्यांवर खोटे गुन्हे दाखल करु नका ,आमचा लढा अन्याय अत्याचार विरोधात आणि सर्वसामान्य गोरगरीब घटकांसाठी आहे ,वंचित बहुजन आघाडी कायम शेतकरी वर्गासाठी रस्त्यावर येऊन आंदोलन करते परंतु राष्ट्रवादी आणि भाजप चे पुढारी जाऊन पोलिस प्रशासनाला हाताशी धरून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात आणि आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात ,आम्ही यापुढेही शेतकरी शेतमजूर गोरगरिबांच्या प्रश्नासाठी कायम लढा देणार आहोत, आमचा आवाज दाबण्याचा कुणीही प्रयत्न करू नये असे प्रा किसन चव्हाण म्हणाले .उपविभागीय आधिकार लबडे मुळा पाटबधांरे अमरापुर आणि ठाणगे शाखाधिकारी कासारपिंपळगाव यांनी लेखी निवेदन दिल्याने रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले,
या प्रसंगी वंचित बहूजन आघाड़ीचे शेवगांव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई, उपाध्यक्ष आजिनाथ आव्हाड,राजूभाऊ नाईक, प्रताप भालेराव, मल्हारी आव्हाड, सुरेश खंडागळे, कानिफनाथ आव्हाड, ज्ञानेश्वर आव्हाड, सुरेश मेजर आव्हाड,मधुकर सरसे, मनोज आव्हाड, पिंटू आंबेकर, ज्ञानेश्वर म्हस्के, रविन्द्र सर्जे, सुधीर आव्हाड,सागर गरूड़,दादा गाढेकर, विष्णु वाघमारे, कडुभाऊ खरात व ईतर शेतकरी बांधव तसेच वंचित बहूजन आघाड़ीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रास्ता रोको मुळे वाहनांच्या लांबवर रांगा लागल्या होत्या रविवारी शेवगाव शहराचा आठवडी बाजार आणि लग्न तिथी असल्याने प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून प्रा किसन चव्हाण यांनी रास्ता रोको आंदोलन अधिकाऱ्यांशी बोलून मागे घेतले.