‘उन्नती’ प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील ६ प्रशिक्षित उमेदवार सन्मानित

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली – केंद्र शासनाच्या ‘उन्नती’ प्रकल्पातंर्गत, आरसेटीच्या माध्यमातून (ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण) प्रशिक्ष‍ित होऊन आर्थिकरित्या सक्षमपणे आपली आणि आपल्या कुंटुबियांची जबाबदारी पार पाडीत असल्याच्या भावना हिंगोली जिल्ह्यातील  चिचोली येथील वंदना भगत यांनी व्यक्त केल्या. पतीचे निधन झाले. दोन मुलं आहेत. शेळीपालनाचे प्रशिक्षण घेतले आणि यातूनच संपूर्ण कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत असल्याचे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले. आज  दिल्लीत येऊन पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांच्यासह अन्य 5 प्रशिक्ष‍ित उमदेवारांना सन्मानित करण्यात आले.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत येणा-या ‘उन्नती’ या प्रकल्पातंर्गत प्रशिक्ष‍ित होऊन स्वंयरोगार करणा-या देशभरातील एकूण 75 उमेदवारांचा आज सन्मान करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील  6 उमेदवारांचा समावेश आहे.

येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय सभागृहामध्ये केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या ‘उन्नती’ प्रकल्पातंर्गत प्रशिक्ष‍ित होऊन स्वंयरोजगार सुरू करणा-या 75 उमेदवारांना सन्मानित करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरिराज सिंह ग्रामीण विकास राज्य मंत्री साध्वी निरंजन ज्योती, श्री फग्गन सिंह कुलस्ते आणि पंचायती राज राज्य मंत्री कपिल पाटील यांचयासह  सचिव (ग्रामीण विकास) श्री नागेंद्र नाथ सिन्हा आणि संयुक्त सचिव (महात्मा गांधी नरेगा) श्री रोहित कुमार उपस्थित होते.

आज झालेल्या कार्यक्रमात उन्नतीच्या माध्यमातून प्रशिक्षित उमेदवारांनी आपले मनोगत मंचावरून मांडलेत.  त्यांच्या आयुष्यात या घेतलेल्या प्रशिक्षणातून झालेला बदल अतिशय सकात्मक असा आहे.

उन्नती  प्रकल्पाविषयी

उन्नती प्रकल्प हा कौशल्यावर आधारीत प्रशिक्षण देणारा प्रकल्प आहे. याअंतर्गत महात्मा गांधी नरेगा लाभार्थींना आरसेटी (ग्रामीण स्वयंम रोजगार प्रशिक्षण)च्या माध्यमातून कौशल्य आधारीत प्रशिक्षण देऊन ज्ञान आणि आजीविकेमध्ये वाढ व्हावी, असे प्रयत्न करते. यामुळे आंशिक रोजगारामधून पूर्णकालीन रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न केला जातो. उन्नती अंतर्गत आतापर्यंत एकूण 18,166 उमेदवारांना प्रशिक्षित केले आहे.

महात्मा गांधी नरेगा योजनेअंतर्गत त्यांना एक वर्षा मागे 100 दिवस रोजगार पूर्ण केले असेल अशा  कुटूबांतील एका प्रौढ (18-45वयोगटातील) व्यक्तीला प्रशिक्षण दिले जाते.

महाराष्ट्रातील 5 प्रशिक्ष‍ित उमेदवारांविषयी

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर पंचायत समितीच्या लाभार्थी मनिषा बोचरे या जीजामाता महिला बचत गटाच्या आहेत.  त्यांनी शेळीपालनचे प्रशिक्षण आरसेटी(ग्रामीण स्वंय रोजगार प्रशिक्षण )च्या माध्यमातून घेतले. त्यांच्याकडे एक बोकड आणि 10 शेळी आहेत. ते लेंडी खत तयार करून विकतात. गरजेच्यावेळी शेळी विकताही येते. यापासून चांगला कुटूबांचा उदरनिर्वाह होतो. आज मिळालेल्या पुरस्काराबद्दल खूप आनंद झाल्याचे त्यांनी सांगीतले.

परभणी जिल्ह्यातील पुर्णा येथील मुंजाजी शिवणकर हे मनरेगामध्ये मजूर म्हणून काम करतात मजूरीतील रकमेतून काटकसर करून म्हैस विकत घेतली. पुढे दोन म्हशी झाल्या त्याचे दूध विकून उदरनिर्वाह करताना आरसेटीमधून म्हशीच्या शेणापासून गांडूळ खत बनविण्याचे प्रशिक्षिण दिले. त्याचा लाभ होतो आहे. दररोजचे 2000 ते 25000 रूपये म्हशींच्या दूधापासून उत्पन्न मिळते. संपूर्ण कुटूबांचे पालनपोषण चांगल्यारीतीने होत असल्याचे अनुभव मांडले.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील दिनेश गावंडे यांनाही आज पुरस्कार मिळाला. त्यांनी गुलाबराव बचत गट सुरू करून ते रोपवाटिका चालवितात. यांनी आरसेटी मधून रोपावाटिकेचे प्रशिक्षण घेतले. रोपवाटिकेमध्ये फळ झाडे, फुल झाडांच्या 150 कलमा उपलब्‍ध असल्याचे त्यांनी सांगीतले. सुरूवातीला 2 गुंटे जमीन होती. आता 2 एकरामध्ये रोपावाटिका असल्याचे सांगीतले, या सर्व प्रवासात शासनाकडून मिळालेल्या मदतीबद्दल त्यांनी धन्यवाद व्यक्त केले.

ओंकार जाधव हा तरूण मुलगा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. त्यांचा पिढीजात दुग्ध व्यवसाय आहे. त्यात फारसा काही आर्थिक फायदा होत नसल्याचे दिसल्यावर त्यांनी आरसेटीकडून प्रशिक्षण घेतले. यामुळे वैरणाचा दुरुपयोग न होता पुरेपूर वापर होऊ लागला. आणि उत्पन्नात भरघोस वाढ झाल्याचे सांगितले.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील अंबादास मेरगल यांनाही उन्नती अंतर्गत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार होते परंतु ते आज  उपस्थित नव्हते.

आजच्या पुरस्कार सोहळयासाठी उप मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र अहिरे, पुण्याचे विस्तार अधिकारी किरण मोरे, सहायक राज्य एमआयएस रविद्र भुते,  सहायक कार्यक्रम अधिकारी सतीश घोडके लाभार्थींसह उपस्थित होते.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web