पोलीस असल्याची बतावणी करून मुलीची केली फसवणूक,पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नेशन न्यूज मराठी टीम.

पंढरपूर– पंढरपूर तालुक्यात एका मुलीला ‘तुला पोलीस भरती करतो तसेच मी पोलीस दलामध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे. माझे वडील आयपीएस अधिकारी आहे’ अशी बतावणी करून मुलीशी लग्न करण्यासाठी घरच्यांची संपर्क वाढवून फसवणूक केल्याप्रकरणी तोतया पोलिसाला पंढरपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. रमेश सुरेश भोसले (वय 22, रा. यलमा मंदिराजवळ आंबे ता. पंढरपूर) असे तोतया पोलिसाचे नाव आहे.

पंढरपूर तालुक्यात एक मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती सहा महिन्यापूर्वी रमेश भोसले यांच्याशी त्या मुलीची ओळख झाली रमेश भोसले यांनी त्या मुलीला मी तुला पोलीस भरती ला मदत करतो मी मंगळवेढा पोलिस ठाण्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे माझे वडील आयपीएस अधिकारी आहेत अशी खोटी माहिती संबंधित मुलीला दिली होती मुलीला व तिच्या घरच्यांशी संबंध वाढवण्यासाठी रमेश भोसले हा खरोखरच पोलीस उपनिरीक्षक आहोत भासविण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक पदाचा खाकी रंगाचा गणवेश, बेल्ट, कॅप, खेळण्यातील पिस्तूल वेश परिधान करत होता. त्यानंतर मुलीच्या घरच्यांचा संपर्क वाढवून त्यांनी वारंवार लग्नासाठी तगादा लावला होता

रमेश भोसले या याच्या अशा वागण्यामुळे सदर मुलीच्या घरच्यांना संशय निर्माण झाला सदर मुलीच्या नातेवाईकांनी मंगळवेढा पोलिस ठाणे व पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात चौकशी केली असताना अशा प्रकारचा कोणताही अधिकारी नसल्याचे समोर आले. आपली फसवणूक होत असल्याचे मुलीच्या घरच्यांना समजून आले मुलीने तात्काळ पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या निर्भया पथककडे याबाबत माहिती दिली. संबंधित मुलीला रमेश भोसले याला भेटण्यासाठी सांगण्यात आले रमेश भोसले सदर मुलीच भेटण्यास आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतली व त्याची चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पंढरपुर विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web