एका गावची अनोखी परंपरा, धुलिवंदनाच्या दिवशी जावयाची गाढवा बसून धिंड

नेशन न्यूज मराठी टीम.

बीड – बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा या गावातील जावयावर गाढवावर बसून जावयाची मिरवणूक आज धुलिवंदनाच्या दिवशी काढली जाते त्याचबरोबर गाढवाला चपलांचा हार घातला जातो गावभर मिरवणूक काढून मनपसंत कपड्यांचा आहेरही जावयाला दिला जातो एकशे सात वर्षाची परंपरा जपण्यासाठी जावयाची गदर्भ वारी काढली जाते तर दुसरीकडे या परंपरेतून सामाजिक एकोपो व सलोखा जपला जात आहे विशेष यंदा गदर्भ सवारीचे मानकरी अमृतराव देशमुख ठरले आहेत.

जावयाला गाढवावर बसवून मिरवणूक काढण्याची अनोखी परंपरा बीडच्या केज तालुक्यातील विडा गावात आहे. रंगपंचमी निमित्त जावई शोधून आणतात. यंदा हा मान तुळजापूरच्या जावयाला मिळाला आहे. मागच्या 100 वर्षांपासून धुलिवंदनाला एका जावयाची गाढवावरून मिरवणूक निघते. यंदा अमृतराजे धनंजय देशमुख या मिरवणुकीचे मानकरी ठरले आहेत. श्रीमंतराव देशमुख यांचे जावई असलेल्या अमृतराजे देशमुख यांना तरुणांनी गुरुवारीच ताब्यात घेतले होते. आज त्यांना गाढवावर बसवून त्यांची मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. या अनोख्या परंपरेची सबंध पंचक्रोशीत चर्चा आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web