नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई – बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, हॅंग ग्लायडर्स, हॉट एअर बलून, खाजगी हेलीकॉप्टर आदींना दि. 8 एप्रिल, 2022 पर्यंत प्रतिबंध करण्याचे आदेश बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) संजय लाटकर यांनी जारी केले आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद असून बृहन्मुंबईचे पोलीस उपआयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी, यांनी हे आदेश निर्गमित केले आहे.