बीड-परळी रस्त्यावर दुचाकीचा अपघात, २ तरुण ठार

नेशन न्यूज मराठी टीम.

बीड – परळी येथून स्कुटी वरुन परतताना वडवणीच्या पुढे रात्री ११:३० ते १२ च्या दरम्यान दुचाकीला अज्ञात वाहनाने समोरासमोर जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. दोघांनाही अत्यवस्थ अवस्थेत बीड जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आसता डॉक्टरांनी तपासणी करून मृत्यू झाल्याचे घोषित केले. अपघात इतका भीषण होता की,स्कुटीचा चुराडा झाला झाला आहे.

हाफेज मारुफ फारोखी ( वय २३ वर्ष ) रा. बशीर गंज बीड, शाहेद बागवान ( वय २१ वर्ष ) रा. बीड असे मयत मित्रांची नावं आहेत. हे दोघेही हैद्राबादला जाणाऱ्या मित्राला परळी येथे रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी गेले होते. मित्राला सोडून स्कुटी क्रमांक एम.एच. २३ बी डी. २५०० वरुन बीडकडे येत होते. यावेळी वडवणी-घाटसावळी दरम्यान रात्री ११:३० ते १२ च्या सुमारास समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोघांनाही मार लागून गंभीर जखमी झाले. अत्यवस्थ अवस्थेत दोघांनाही उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात येताच डॉक्टरांनी तपासणी करून मृत्यू झाल्याचे घोषित केले. धडक इतकी भीषण होती की, स्कुटीचा पुर्णपणे चुराडा झाला आहे.अवघे २३ व २१ वर्षाचे तरुण अचानक गेल्याने कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web