युवक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वाहनाला ट्रकची धडक; एक ठार पाच जखमी

नेशन न्यूज मराठी टीम.

अमरावती – अकोला येथे आयोजित युवक काँग्रेसचा कार्यक्रम आटपून अमरावतीला परत येणाऱ्या युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वाहनाला दर्यापूर जवळ आराळा येथे ट्रकने धडक दिली. शनिवारी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात युवक काँग्रेस अमरावती लोकसभा महासचिव रोहित अजय देशमुख (27) हे जागीच ठार झाले. या घटनेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
या अपघातात रोहित देशमुख यांच्यासोबत कारमध्ये असणारे युवक काँग्रेसचे अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, चांदुर रेल्वेचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचा मुलगा परीक्षित जगताप, युवक काँग्रेसचे मेळघाट विधानसभा अध्यक्ष पंकज मोरे आणि वाहनचालक व सनी नावाचा युवक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातात दगवलेला रोहित देशमुख हा माजी खासदार के.जी. देशमुख यांचा नातू असून जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा समर्थक होता. रोहितचे वडील अजय देशमुख हे टाकरखेडा सभुचे माजी सरपंच होते. रोहित देशमुख यांच्या पार्थिवावर आज (रविवारी) सायंकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत. सायंकाळी 5 वाजता रोहित देशमुख यांच्या रुख्मिणी नगर येथील निवासस्थानावरून अंत्ययात्रा निघणार आहे. रोहितच्या मृत्यूमुळे देशमुख कुटुंबियांसह शहर आणि जिल्हा काँग्रेसवर शोककळा पसरली आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web