बीड मध्ये मराठी राज्य नाट्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद, बेबी नाटकाने जिंकली रसीकांची मने

नेशन न्यूज मराठी टीम.

बीड– महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत यावर्षी 60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन गुरुवार दि. १० मार्च ते रविवार दि.२० मार्च या कालावधीत बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह रोज सायंकाळी ७ वाजता करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत एकूण ११ नाट्यसंस्था सहभागी झालेल्या आहेत. गुरुवारी या स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी या नाट्य स्पर्धेला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त  प्रतिसाद दिसून आला. शुक्रवारी सादर झालेल्या बेबी या नाटकाने रसिकांची अक्षरश: मने जिंकली.  दरम्यान रसिकांनी नाटकांचा आनंद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य  संचालनालयाचे संचालक बिभिषण चवरे यांनी केले आहे.
       महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा संपन्न होत आहेत. कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा.  त्या कलागुणांमधून व्यक्तिमत्व विकास घडून आणावा. नाट्यकलेचा प्रचार व प्रसार सर्वस्तरातून करावा. सांस्कृतिक वातावरण तयार व्हावे हा उद्देश ठेवून शासन राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन गेली 59 वर्षापासून करत आला आहे. यावर्षी 60 व्या वर्षात राज्यनाट्य स्पर्धा पोहोचली आहे. आपण या स्पर्धेचा आस्वाद घेण्याकरिता व कलावंतांना प्रोत्साहित करण्याकरिता सर्व रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन  सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभिषण चवरे, बीड नाट्य स्पर्धेचे समन्वयक म्हणून मुकुंद धुताडमल यांनी केले आहे.

मराठी नाट्य स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी बेबी हे नाटक सादर झाले. बागबान सामाजिक प्रतिष्ठान गेवराई यांनी सादर केलेल्या बेबी या नाटकाने रसिकांची मने जिंकली. या नाटकाचे लेखक विजय तेंडुलकर यांनी अतिशय महत्वाचा विषय या नाटकात मांडलेला आहे. या नाटकाचे दिगदर्शक शेख अस्लम  यांनी उत्तम प्रकारे दिगदर्शन करून नाटकाची उंची अजून वाढविली आहे. एकंदरीत बेबी  हे नाटक रसिकांच्या मनात घर करून गेले.

रविवार दि.१३ मार्च रोजी जात जात नाही, सोमवार दि. १४ मार्च रोजी चरक, मंगळवार दि.१५ मार्च रोजी अजून ही  उजाडत नाही, बुधवार दि.१६ मार्च रोजी भेट, गुरुवार दि.१७ मार्च रोजी श्त्री सन्मानार्थं, मातृ धर्म सन्मानार्थ, शुक्रवार दि.१८ मार्च रोजी ११ महिने १४ दिवस, शनिवार दि. १९ मार्च रोजी उचल, रविवार दि.२० मार्च रोजी कस्तुरी ही नाटके सायंकाळी ७ वाजता सादर होणार आहेत.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web