फेलोशिपसाठी आमरण उपोषणास बसलेल्या संशोधक विद्यार्थ्याना वंचित युवा आघाडीचा जाहीर पाठींबा

नेशन न्यूज मराठी टीम.

पुणे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) च्या माध्यमातून देण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती ( BANRF २०१८ ) मात्र एम.फिल ते पीएच.डी साठी सलग अधिछात्रवृत्ती देण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांवर सातत्याने जाणीवपूर्वक शैक्षणिक अत्याचार होत आहे.ह्या विरुद्ध सातत्याने आपल्या न्याय मागणीसाठी सामाजिक न्याय विभागाकडे पत्रव्यवहार आणि आंदोलन करीत आहेत.

सदर संशोधक विद्यार्थ्यांनी ह्यापूर्वी परळी येथे सलग ९ दिवस उपोषण केले होते.त्यावेळी एक ते दीड महिन्याच्या आत फेलोशिप चा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देऊन त्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्यात आले.मात्र अद्यापही हा प्रश्न मार्गी न लागण्यात आला नाही.ही विद्यार्थ्यांना दिली जाणारी वागणूक संतापजनक आहे.त्यामुळे न्याय मागण्यासाठी नाईलाजाने सदर अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागत आहे.ही बाब सामाजिक अन्याय करणारी आहे.कारण हे विद्यार्थी बार्टीच्या पुणे येथील कार्यालयावर ८ मार्च पासून आमरण उपोषणाला बसले आहेत .वंचित बहूजन युवा आघाडीच्यावतीने बार्टी कार्यालय, पुणे येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यात आला. संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्या सामाजिक न्याय विभागाने तत्काळ मंजूर करावा ही मागणी युवा आघाडीची आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web