युक्रेन येथून घरी परतलेल्या विद्यार्थ्याची जिल्हाधिकारी यांनी घेतली भेट

नेशन न्यूज मराठी टीम.

बीड -युक्रेन आणि रशिया युद्ध सुरू असल्यामुळे शिक्षणासाठी युक्रेन येथे अडकवलेला आष्टी येथील अनिकेत लटपटे हा बुधवारी सुखरूप घरी परतला आहे. त्यामुळे गुरुवारी बीडचे जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी बीड जिल्ह्यातील आष्टी येथील निवासस्थानी भेट घेऊन विचारपूस केली. 
 युक्रेन येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या अनिकेत लटपटे हा रशिया आणि युक्रेन युद्ध परिस्थितीत अडकला होता. तो बुधवारी आष्टीच्या मुर्शदपुर भागातील आपल्या घरी सुखरूप पोहचला.

त्याबद्दल बीडचे जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी अनिकेत लटपटेची भेट घेऊन सविस्तरपणे चर्चा करून त्याची विचारपूस केली. यावेळी ज्येष्ठ नेते बलभीम सुंबरे, नायब तहसीलदार बाळ दत्त मोरे अक्षय साप्ते सह मान्यवर यावेळी उपस्थित होते

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web