बीड मध्ये १० ते २० मार्च दरम्यान मराठी नाट्य स्पर्धा

नेशन न्युज मराठी टिम.

कल्याण– महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत यावर्षी 60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन गुरुवार दि. १० मार्च ते रविवार दि.२० मार्च या कालावधीत बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह रोज सायंकाळी ७ वाजता करण्यात आले आहे.या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत एकूण ११ नाट्यसंस्था सहभाग घेणार आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा संपन्न होत आहेत. कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा. त्या कलागुणांमधून व्यक्तिमत्व विकास घडून आणावा.

नाट्यकलेचा प्रचार व प्रसार सर्वस्तरातून करावा. सांस्कृतिक वातावरण तयार व्हावे हा उद्देश ठेवून शासन राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन गेली 59 वर्षापासून करत आला आहे.  यावर्षी 60 व्या वर्षात राज्यनाट्य स्पर्धा पोहोचली आहे. आपण या स्पर्धेचा आस्वाद घेण्याकरिता व कलावंतांना प्रोत्साहित करण्याकरिता सर्व रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चौरे यांनी केले आहे. तसेच बीड केंद्राचे समन्वयक म्हणून मुकुंद धुताडमल , सहसमन्वयक प्रविण निसर्गंध,प्रविण राठोड,दिनेश पाटोळे,अक्षय कोकाटे,वैभव निवारे,किसन जाधव,अक्षय जाधव हे काम बघत आहेत.

गुरुवार दि.१० मार्च रोजी वानरायण, शुक्रवार दि.११ मार्च रोजी बेबी, शनिवार दि.१२ मार्च रोजी वास्तव,रविवार दि.१३ मार्च रोजी जात जात नाही, सोमवार दि. १४ मार्च रोजी चरक, मंगळवार दि.१५ मार्च रोजी अजून ही  उजाडत नाही, बुधवार दि.१६ मार्च रोजी भेट, गुरुवार दि.१७ मार्च रोजी श्त्री सन्मानार्थं, मातृ धर्म सन्मानार्थ, शुक्रवार दि.१८ मार्च रोजी ११ महिने १४ दिवस, शनिवार दि. १९ मार्च रोजी उचल, रविवार दि.२० मार्च रोजी कस्तुरी ही  नाटके सायंकाळी ७ वाजता सादर होणार आहेत.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web