पन्नास हजाराची लाच मागितल्याप्रकरणी एपीआय अँटी करप्शनच्या जाळ्यात

नेशन न्यूज मराठी टीम.

सोलापूर-गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एक लाखाची लाच मागून तडजोडी अंती 50 हजार रुपये मागितल्या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश श्रीकांत कुलकर्णी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला पुणे या ठिकाणी सोलापूर विभागातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 8 मार्च रोजी सकाळी ताब्यात घेतल्याची उपअधीक्षक संजीव पाटील यांनी दिली.एपीआय कुलकर्णी याविरोधात जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून कोर्टात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करणार आहे.

तक्रारदार यांचा मेहुणा याचे विरुध्द जोडभावीपेठ पोलीस स्टेशन, सोलापूर शहर येथे गुन्हा दाखल झाला होता. सदर दाखल गुन्हयाचा तपास यातील एपीआय दिनेश श्रीकांत कुलकर्णी हे करीत होते. सदर गुन्हयात तक्रारदार, त्यांची पत्नी, सासु, मोठा मेहुणा, मेहुणी व तीचा नवरा (तक्रारदार यांचा साडु) असे देखील आरोपी होते.यामध्ये त्यांना आरोपी करायचे नसेल तर तक्रारदार यांच्याकडे ०१ लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ५०,०००/- रुपये स्विकारण्याचे मान्य करुन वैयक्तीक सांपत्तीक फायदा मिळवण्यासाठी गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन केले.
अँटी करप्शन विभागाने प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार 31 जानेवारी 2022 ,1 फेब्रुवारी,2 फेब्रुवारी रोजी पडताळणी केली.या पडताळणी नुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 8 मार्च 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हि कारवाई उमाकांत महाडिक,पोलीस नाईक कोष्टी,सन्नके,सुरवसे यांनी केली आहे

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web