नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, ‘सायक्लोथॉन२०२२’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी मुंबई – सायकलसारख्या इंधनविरहित वाहनाचा वापर वाढवून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचे महत्व प्रसारित करण्याकरिता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘सायक्लोथॉन 2022’ मध्ये 300 हून अधिक सायकलपटूंनी उत्स्फुर्तपणे सहभागी होत ‘इंधनावरील वाहनांना नकार, इंधनविरहित सायकलचा स्विकार’ असा वसुंधरा जपणुकीचा व्यापक संदेश प्रसारित केला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, ‘सायक्लोथॉन 2022’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन सायकलींग क्लब ऑफ इंडिया यांच्या सहयोगाने करण्यात आले होते. नवी मुंबईचा ‘क्विन्स नेकलेस’ म्हणून ओळखल्या जाणा-या पामबीच मार्गावर सकाळी 7.15 वाजल्यापासून सानपाडा येथील मोराज सर्कलपासून सायक्लोथॉनचा प्रारंभ होऊन महापालिका मुख्यालयासमोर सांगता झाली.

नवी मुंबई महानगरपालिका लोकहिताय कामात नेहमीच आघाडीवर राहिलेली असून महाराष्ट्र शासनाने गतवर्षी सुरू केलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान’ मध्येही 2021 मध्ये नवी मुंबई राज्यात व्दितीय क्रमांकाचे मानांकित शहर ठरले आहे. यावर्षी ‘माझी वसुंधरा अभियान 2022’ ला सामोरे जाताना ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे ध्येय नजरेसमोर ठेवून महानगरपालिकेने वाटचाल सुरू केलेली आहे. यादृष्टीने विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जात असून सायक्लोथॉन हा त्याचाच एक भाग असल्याचे सांगत अतिरिक्त आयुक्त तथा माझी वसुंधरा अभियानाच्या नोडल अधिकारी श्रीम. सुजाता ढोले यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होणा-या सायकलपटू नागरिकांचे आभार मानले. यावेळी त्यांच्या समवेत उपस्थितांनी माझी वसुंधरा अभियानाची सामुहिक शपथ ग्रहण केली.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांच्या समवेत प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, शहर अभियंता श्री. संजय देसाई, क्रीडा विभागाचे उपआयुक्त श्री. मनोज महाले, उद्यान विभागाचे उपआयुक्त श्री. जयदीप पवार, परवाना विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार, इटीसी केंद्र संचालक श्रीम. वर्षा भगत. तुर्भे विभागाचे सहा. आयुक्त श्री. सुबोध ठाणेकर, सहा. आयुक्त श्री. दत्तात्रय घनवट, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे, कार्यकारी अभियंता श्री. सुभाष सोनावणे, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव व श्रीम. अभिलाषा म्हात्रे आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सायकलींग क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष श्री. जय पाटील, 24 हजार किमी सायकलींगचा विक्रम करणारे झारखंडचे सायकलींग सम्राट अमित कुमार, काश्मिर ते कन्याकुमारी अंतर सायकलवर पार करणारी सर्वात लहान सायकलपटू 10 वर्षीय सई पाटील तसेच अभिनेते श्री. मयुर लाड यांची याप्रसंगी विशेष उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते सर्वात जलद सायक्लोथॉनचे अंतर पार करणा-या सायकलपटूंचा प्रशस्तिपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये वयाच्या 74 व्या वर्षीही नियमित सायकलींग करून युवकांना प्रेरणा देणारे सायकलपटू श्री. राज शर्मा यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे सायक्लोथ़ॉनमध्ये प्रत्यक्ष सहभागी होत अंतर पूर्ण करणारे महापालिका उपआयुक्त श्री.दादासाहेब चाबुकस्वार, श्री.जयदीप पवार व डॉ. श्रीराम पवार यांनाही प्रशस्तिपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. पनवेल महानगपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीम. तृप्ती सांडभोर यांनीही सहभागी होत सायक्लोथॉन पूर्ण केली. सायकलींगची ही सवय कायम राखल्याने इंधनविरहित वाहनाच्या वापराव्दारे पर्यावरण संरक्षण व त्यासोबतच स्वआरोग्याची जपणूक असा दुहेरी उद्देश सफल होत असल्याने यापुढील काळात नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून अशी विविध प्रकारचे उपक्रम महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने आयोजित करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी सांगितले. 300 हून अधिक सायकलपटूंनी सायक्लोथॉनमध्ये उत्साहाने सहभागी होत नवी मुंबई शहराविषयीचे आपले प्रेम अधोरेखित केले असल्याची भावना त्यांनी

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web