नेशन न्युज मराठी टिम.
बीड – आष्टी तालुक्यातील बीड – अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील वटणवाडी येथील एका ४२ वर्षीय महिलेचा जमिनीच्या मोहातुन खुन करून मृतदेह तीच्याच जमिनीत गाढुन पुरावा नष्ट केल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस येताच तीन संशयित आरोपींना आष्टी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. मयत महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून भरत गायकवाड, प्रल्हाद घुमरे, सुनिल गांगुर्डे यांना ताब्यात घेन्यात आले आहे. मंदा हरिभाऊ गायकवाड असे खुन करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील वटणवाडी येथील मंदा हरिभाऊ गायकवाड वय ४५ वर्ष विधवा ती होती. तीला तीन विवाहित मुली असुन त्या सासरी आहेत. भावकीतीलच भरत गायकवाड व जावई प्रल्हाद घुमरे, आणि त्याचा मित्र सुनिल गांगुर्डे हे सतत महिलेला फोन करून व प्रत्यक्ष भेटुन जमिन आमच्या नावावर कर असा तगादा लावत जिवे मारण्याची धमकी द्यायचे .यातुनच त्यानी ३ नोव्हेंबर २०२१ रोजी सदरील महिलेला रात्री शेतात तुरीला पाणी देण्याच्या बहाण्याने घेऊन जाऊन तिचा खुन करून मृतदेह जमिनीत पुरून टाकल्याचे २ फेब्रुवारी २०२२ रोजी बुधवारी निष्पन्न होताच मयत महिलेचा भाऊ केरू किसन चितळे यांच्या फिर्यादीवरून ३ मार्चला आष्टी पोलिसांनी मोठ्या शिताफीने भरत पोपट गायकवाड रा.वटणवाडी, प्रल्हाद नवनाथ घुमरे, सुनिल पंढरीनाथ गांगुर्डे दोघे रा. घाटापिंपरी यांना ताब्यात घेऊन पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहेत.
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, पोलीस निरीक्षक सलिम चाऊस, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब गोसावी , यांनी भेट दिली. चार महिन्यांपासून बेपत्ता होती. सदरील महिला ही ३/ ११/ २०२१ रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार आष्टी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. नंतर तिचा शोध घेतला गेला पण मिळुन आली नाही. ती चार महिन्यांपासून गायब होती. अखेर २ फेब्रुवारी रोजी स्वत:च्या शेतात पुरलेला मृतदेह आढळून आला. ३ मार्च रोजी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरु आहे.