नेशन न्युज मराठी टिम.
कल्याण – अनेक वर्षे सेंच्युरी रेयॉनचा रेयॉन वर्कर्स युनियन मध्ये राजराम साळवी यांच्या युनियनचे वर्चस्व होते. गेले १३ वर्ष येथे निवडणूक न झाल्याने या बाबतचा वाद औद्योगिक न्यायालयात गेला होता . या बाबत औद्योगिक न्यायाल्याने निवडणूक घेण्याचे आदेश दिल्याने झालेल्या निवडणुकीत प्रमुख पदावर परिवर्तन पँनलने बाजी मारली
गेली ३२ वर्ष सेंच्युरी रेयॉन मधील राजाराम साळवी यांच्या युनियनचे वर्चस्व होते. या नंतर गेल्या १३ वर्ष येथे निवडणूक न झाल्याने रवींद्र कोनकर व कृष्णा पाटील आणि २२ कामगारांनी कामगार आयुक्त यांच्या दावा दाखल केला होता.त्या नंतर या कामगारांनी या अभिवक्ता नितीन शिवकर यांच्या मार्फत उच्च न्यायालय येथे दावा दाखल केला होता.या दाव्यावर सुनवाई करताना उच्च न्यायालयाने सदर प्रकरण औद्योगिक न्यायाल्याच्या कक्षेतील असल्याने त्यांच्या कडे दाद मागावी असा निर्णय दिला .यामुळे ठाण्याच्या औद्योगिक न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता.
औद्योगिक न्यायालयात हे प्रकरण ३ वर्ष चालले.कोविड काळात या बाबतच्या कामकाजाची गती मंदावली.या साठी लागणारी आर्थिक बाजू कामगारांनी पन्नास शंभर रुपये काढून भागवली. या बाबत अभिवक्ता नितीन शिवकर हा प्रकार औद्योगिक न्यायालच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश औद्योगिक न्यायालयाने दिले.हे प्रकरण सुरू असताना रवींद्र कोनकर व कृष्णा पाटील व इतर कामगारांनी शिव भारतीय जनरल युनियनचे संतोष सावंत याच्या कडे मार्गदर्शन करण्याची मागणी केली.त्यामुळे संतोष सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही लढाई लढली गेली.
या बाबत औद्योगिक न्यायालयाने आदेश दिले की , अभिवक्ता अरविंद तापोले यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक घेण्यात यावी.त्या प्रमाणे अरविंद तापोले याच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक घेण्यात आली. यात अध्यक्ष पदा साठी राजाराम साळवी यांचा पराभव रवींद्र कोनकर यांनी केला.
या रेयॉन वर्कर्स युनियनचे निवडणुकीत परिवर्तन
पँनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार रवींद्र कोनकर यांचे बरोबर जनरल सेक्रेटरी रमेश यादव, उपाध्यक्ष कृष्णा पाटील, खजिनदार जे पी पांडे ,उपाध्यक्ष रेयॉन प्रमोद काळे, संयुक्त सचिव रेयॉन नरेश कोनकर, उपाध्यक्ष टायर कार्ड शिवाजी पाटील, संयुक्त सचिव टायर कार्ड आरडी सिंह, संयुक्त सचिव कार्ड कृष्णा मढवी हे पदाधिकारी निवडून आले आहेत तर सदस्य पदी सुभाष सुतार, वाय सी यादव, आर के सिंह, वीरेंद्र यादव बाळा पाटील, प्रदीप ओझा हे निवडून आले आहेत.