एसटी आणि बुलेटचा भीषण अपघात,तीन मित्राचा मृत्यु

नेशन न्यूज मराठी टिम.

बीड – अहेर वडगाव या ठिकाणाहून तीन मित्र बुलेटवर बसून बीडच्या दिशेने चालले असता. त्यावेळी एसटी आणि बुलेट यांचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की या अपघातात बुलेटवर बसलेल्या तिन्ही मित्रांचा मृत्यू झाला आहे. तिन्ही मित्रांचा मृत्यू झाल्याने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बुधवारी रात्री ८ च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. पारसनाथ रोहिटे, कृष्णा शेळके, अक्षय मुळे अशी अपघातात मृत झालेल्याची नावं आहेत. हे तिघेही रात्री आठच्या सुमारास बुलेट क्रमांक MH 23, L 7227 या क्रमांकाच्या बुलेटवरून अहेर वडगावहून बीडच्या दिशेने येत होते. त्याचवेळी धुळे सोलापूर रस्त्यावरून समोरून आलेल्या बसने समोरून बुलेटला धडक दिली.
या अपघातात पारसनाथ, कृष्णाचा जागीच मृत्यू झाला. तर अक्षयला जखमी अवस्थेत बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान अक्षयचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web