नेशन न्यूज मराठी टीम.
कोल्हापूर – राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केले. त्याच्या निषेधार्थ देशभरात ठिकठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज कोल्हापुरातील महाविकासआघाडी मधील घटक पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हीच्याकडून केलेल्या जमीन खरेदी व्यवहाराचा संशयावरून ईडने ना. नवाब मलिक यांना ताब्यात घेतले आहे. याच्या निषेधार्थ राज्यभरात महाविकास आघाडीच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून आज कोल्हापुरात महाविकासआघाडी मधील घटक पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन करण्यात आली होती.यावेळी दुपारी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी ईडी सारख्या यंत्रणेचा वापर करून भाजप सरकार लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करत असल्याचा आरोप केला. तर भाजपच्या दबावाला झुकणार नाही. यापुढे जशास तसे उत्तर देऊ असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना दिला.