अमरावती मध्ये खासगी बस नाल्यात पलटली, बसमध्ये ४० पेक्षा जास्त प्रवासी

नेशन न्यूज मराठी टीम.

अमरावती- अमरावतीत खाजगी बस नाल्यात पलटली. काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. अमरावतीवरून मोर्शीमार्गे मध्यप्रदेशकडे ही बस जात होती. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. बसमध्ये 40 पेक्षा अधिक प्रवासी होते. अमरावती-नागपूर महामार्गावरील अर्जुननगर परिसरातील घटना ही घटना घडली. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. या वाक्याला तंतोतंत शोभेल अशी घटना अमरावतीमध्ये घडली. अमरावतीवरून मोर्शीमार्गे मध्यप्रदेशमधील बैतुलकडे एक खासगी बस जात होती. ही खाजगी बस नाल्यात पलटी झाल्याची घटना अमरावती-नागपूर महार्गावर अमरावती शहरातील अर्जुन नगर परिसरात घडली.
सुदैवाने या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झालेत. कुठलीच जीवितहानी झाली नाही.

बसमध्ये जवळपास चाळीसपेक्षा जास्त प्रवासी होते. बस पूर्ण क्षमतेने होती. दरम्यान, किरकोळ जखमी असलेल्या प्रवाशांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले आहे. दरम्यान, एसटी महामंडळच्या बस बंद आहेत. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर अमरावती शहरात अवैधपणे खासगी वाहतूक सुरू आहे.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास मध्यप्रदेशमधील होशगांबाद येथील एक खासगी बस अमरावतीमधून मोर्शीमार्गे मध्यप्रदेशमध्ये प्रवासी घेऊन जात होती. सध्या एसटी बस बंद आहेत. त्यामुळं ही खासगी बस खचाखच प्रवाशांनी भरून प्रवाशाची वाहतूक केली जात आहे. अशातच अमरावती शहरात अर्जुन नगर परिसरात ही बस येताच रोडच्या कडेला असलेल्या एका नाल्यात पलटी झाली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला, असावा असा अंदाज आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web