भेकराच्या पिल्लाची विक्री करणाऱ्या तीन आरोपींना अटक,ठाणे वनविभागाची कारवाई

नेशन न्यूज मराठी टीम.

शहापूर – भेकराच्या पिल्लाची विक्री करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आले असून ठाणे वनविभागाने हि  धडक कारवाई केली आहे.  रमेश तुकाराम वाळिंबे रा. आल्यानी, बारकु गणपत हिलम, रा. कळगाव, गणेश गुरुनाथ वाघ, रा. कळगाव अशी आरोपींची नावे असून हे तिघेही शहापूर तालुक्यात राहणार आहेत.

वनविभागाला मिळालेल्या गुप्त बातमीनुसार उपविभागीय वन अधिकारी मांडवी स्थित ठाणे सुनील नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली एस. बी. देवरे वनक्षेत्रपाल पडघा यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध सापळा रचून रेंज स्टाफ वनपाल वनरक्षक पडघा यांच्या समवेत नाशिक मुंबई महामार्गावर सर्व्हिस रोड जवळ मौजे कासने गाव हद्दीतील पॅरामाउंट हॉटेल शेजारी भेकर जातीचे पिल्लू अवैध विक्री व्यवहार करताना तीन आरोपींना जिवंत भेकरचे पिल्ला सोबत पकडले.  या आरोपींना भिवंडी येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

या कारवाईत वनपाल पडघा  दिनेश माळी, वनपाल वडपा विलास निकम, वनपाल दिघाशी श्याम चतुरे, वनरक्षक सांगावं अजय राठोड, वनरक्षक पाच्छापूर अमित कुलकर्णी, वनरक्षक लोनाड जमीर इनामदार, कार्यालयीन लेखापाल पंकज भाऊसाहेब, महेंद्र भेरे कार्यालयीन कर्मचारी,  वाहन चालक विकास उमतोल, संतोष गोडांबे, वनमजूर यांनी सहभाग घेतला. या कारवाईत आरोपीने वापरलेल्या दोन मोटार सायकल जप्त केल्या असल्याची माहिती वनपाल साहेबराव खरे यांनी दिली. 

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web