पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वेरूळ वन उद्यानाचे लोकार्पण

नेशन न्यूज मराठी टीम.

औरंगाबाद – पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज वेरूळ लेण्यांच्या समोरील वेरूळ वन उद्यानाचे लोकार्पण केले.उपवन सरंक्षक अंतर्गत वन परीक्षेत्र खुलताबादच्या वेरूळ उद्यानाच्या लोकार्पण कार्यक्रमानंतर ठाकरे यांनी वेरूळ पर्यटन केंद्र, कैलास लेणी व परिसरासह शहाजी महाराज भोसले स्मारकाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई, आमदार अंबादास दानवे, आमदार प्रशांत बंब, चंद्रकांत खैरे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web