भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालयाची प्रवेशक्षमता १०० करण्यास परवानगी

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई – नागपूरच्या नंदनवन येथील भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालयाची प्रवेशक्षमता सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून 60 वरुन 100 करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

या आयुर्वेद महाविदयालयातील बी.ए.एम.एस. या नमूद आयुर्वेद या पदवी अभ्यासक्रमांची विद्यार्थी प्रवेशक्षमता ही भारतीय चिकित्सा पध्दती राष्ट्रीय आयोग यांनी निर्धारीत केल्यानुसार 100 इतकी राहील.  सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार सदर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने या अभ्यासक्रमाच्या वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता प्राप्त झाल्यानंतर संस्थेत विद्यार्थी प्रवेश देण्यात येतील.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web