फेरीवाल्यांकडून हप्ता वसुलीचा व्हिडियो झाला व्हायरल, पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण – कल्याण अडीवली ढोकाळी परिसरात आठवडे बाजारत फेरीवाल्यांकडून हप्ता उकळल्याप्रकरणी फेरीवाल्यानी दिलेल्या तक्रारी नुसार  मानपाडा पोलीस ठाण्यात संजय सिंग , नरेश, रोहन, मामा यांच्यासह माजी नगरसेवक कुणाल पाटील अशा पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी व्हिडिओत पैसे घेताना दिसत असलेल्या संजय सिंग याला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

कल्याण अडवली ढोकली परिसरामध्ये आठवडे बाजार भरत आहेत या बाजारातून मोठ्या प्रमाणात हप्ते वसूल करण्यात येत असल्याचा व्हिडीओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे
या हप्तेखोरी मागे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या सोबत काम करणाऱ्या व्यक्तींकडून हप्ता वसुली केला जात असल्याचा आरोप काही व्यवसाय करण्याऱ्या कडून केला जात आहे. तर काही व्यावसाईक यांच्या कडे विचारणा केली आसता त्यांचे म्हणणे आहे कि आमच्या कडून कोणीच पैशाची वसुली करत नाही तर आम्ही फक्त केडीएमसी प्रशासनाची पावती फाडतो.

या प्रकरणी कुणाला पाटील यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला आसता त्याच्या कडून असे सगण्यात येते कि माझ्या राजकीय विरोधकान कडून माझे विरोधात षड्यंत्र रचले जात आहे. यात काही तथ्य नाही.

एकंदरीत सर्व प्रकरण पाहता पोलिसांच्या तपासातूनच नेमके सत्य काय आहे हे बाहेर येईल.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web