नेशन न्यूज मराठी टीम.
अहमदनगर – महाकवी वामनदादा कर्डक. एक असे व्यक्तीमत्व ज्यांनी आपल्या कविता, गझल आणि गीतांतून समता-बंधुता-न्याय ही आपल्या संविधानाची त्रिसूत्री आणि फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार खेडोपाडी पोहचविले. त्यांनी समाजपरिवर्तन लढ्यासाठी आपले जीवन आसे पर्येंत झिजवले. गरीब, कष्टकरी, कामगार वर्गाच्या केवळ व्यथा आणि कथाच मांडल्या नाहीत तर समता-बंधुता-सामाजिक न्याय टिकून राहावा याकरिता देखील तळमळीने लेखन केले. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाला अभिवादन करण्यासाठी महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे
समता, बंधुता, सामाजिक न्याय, संविधान, लोकशाही मूल्ये याबाबत आपल्या वाणीतून, लेखणीतून समाज प्रबोधन करणारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावन्त अनुयायी लोककवी वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी वर्ष दिनांक १५ ऑगस्ट २०२१ ते १४ ऑगस्ट २०२२ या काळात पु ल कट्टा कल्याणच्या वतीने विविध उपक्रम आयोजित करून साजरे करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पु ल कट्टाची टीम हि गावोगावी फिरून महाकवी वामनदादा कर्डक यांच्या महान कार्याला उजाळा देत आहे.

वामनदादा कर्डक जन्मशताब्दी आपल्या दारी या पु ल कट्टाच्या उपक्रमा अंतर्गत प्रतिभासंपन्न व्यक्तिची भेट घेऊन त्यांना वामनदादा यांची प्रतीकृत भेट दिली जात आहे. याचा प्रारंभ हा हिवरे बाजार गावाचे प्रज्ञावंत सरपंच माननीय पोपटराव पवार यांना भेटून करण्यात आला.
पु ल कट्टाच्या टीमने पोपटराव पवार यांच्या सोबत संवाद साधला त्यावेळी माननीय पोपटराव पवार बोलत होते कि आंबेडकरी चळवळीतील विचारांच्या साहित्याचा कार्यक्रम कुठे असेल तिथे महाकवी वामनदादा कर्डक यांचा आवाज खनखनल्या शिवाय राहत नव्हता.फुले शाहू आंबेडकरांच्या साहित्याचा प्रचार व प्रसार हा दिन दलित वंचित घटका परेंत पोहोचविन्याचे मौल्यवान काम जर कोणी केले असेल तर ते काम महाकवी वामन दादा कर्डक यांनी केले आहे. संपूर्ण समाजात जागृती करण्याचे काम महाकवी वामनदादा कर्डक यांनी जिवंत असे पर्येंत केले . म्हणूनच वामनदादाचं साहित्य आजही तेवढेच प्रेरणादायी आहे कि त्यातून जर प्रेरणा घेतली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या बैठकीला आजही खूप मोठी चालना मिळेल. असे बोलून पोपट राव पवार यांनी वामनदादा कर्डक यांना आदरांजली वाहिली.