इंडिया ओपन २०२२ मधील यशाबद्दल मालविकाचे पालकमंत्री यांनी केले अभिनंदन

नेशन न्युज मराठी टीम.

नागपूर – इंडिया ओपन 2022 बॅंडमिंटन स्पर्धेत जगज्जेत्या सायना नेहवालला नागपूरची मालविका बनसोड हिने तिसऱ्या फेरीत चित करुन विक्रमी कामगिरी केली आहे. या विक्रमी कामगिरीची दखल घेत राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मालविकाला प्रत्यक्ष  फोन करून तिचे अभिनंदन केले.

“मालविका तू केलेली कामगिरी तमाम नागपूकरांसाठी नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. तुझे करावं तेव्हढे कौतूक कमीच आहे. तू अशीच उंच भरारी घेत यशाची शिखरे पादाक्रांत करत जा, मी सदैव तुझ्या पाठिशी आहे,” असे गौरोद्वगार डॉ. राऊत यांनी यावेळी दिल्लीत आपल्या आईसोबत आलेल्या मालविकाशी बोलताना काढले. कस्तुरचंद पार्क येथील एका कार्यक्रमात मालविकाचा सत्कार केल्याची आठवण ही त्यांनी यावेळी काढली.

नागपूरसारख्या शहरातून मालविका हिने  इंडिया ओपन 2022 मध्ये सहभाग घेत केलेली कामगिरी राज्यासाठी अभिमानास्पद आहे. नागपूर शहरातून मालविका सारखे खेळाडू उंच भरारी घेत आहेत. मालविकाने केलेल्या कामगिरीमुळे नागपूर शहराचे नाव अजून एकदा जागतिक पातळीवर उंचावले आहे. भविष्यात मालविका अशीच उत्तोमोत्तम कामगिरी करीत राहील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही विजय मिळवत राहील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. मालविकाला भविष्यात जागतिक पातळीवर खेळण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे डॉ राऊत यांनी तिच्याशी बोलताना म्हटले.

 प्रतिकूल परिस्थितीतही मात करून विजय कसा मिळवायचा याचे उत्तम उदाहरण मालविका हिच्या रूपात सर्वांसमोर आले आहे. उदयोन्मुख खेळाडूंना तिच्याकडून प्रेरणा मिळेल व विशेषत: ग्रामीण भागातून यामुळे दर्जेदार जागतिक पातळीवरचे खेळाडू निर्माण होतील असा विश्वास डॉ. राऊत यांनी व्यक्त केला.

कस्तुरचंद पार्क येथे 2020 मध्ये डॉ. नितीन राऊत यांनी मालविका हिचा सत्कार केला होता, ती नेहमी राऊत साहेबांची आठवण काढते, तुमचे आशिर्वाद व शुभेच्छा माझ्या मुलीसोबत असू दया अशी प्रतिक्रिया मालविकाचे वडील डॉ. प्रबोध बनसोड यांनी यावेळी व्यक्त केली.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web