नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी…
Year: 2022
रस्त्यावरील बालकांसाठी फिरते पथकासाठीस्वयंसेवी संस्थांनी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी – रस्त्यावरील मुलांना काळजी व संरक्षणाची गरज असून त्यांना शिक्षणाच्या व…
उत्कृष्ट निर्यात पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी – राज्य शासनाच्या वतीने उत्कृष्ट निर्यातदारांना राज्यस्तरीय निर्यात पुरस्काराने गौरविण्यात येणार…
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ६ जानेवारी रोजी‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी – जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी येत्या 6 जानेवारी 2023 रोजी…
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या संकल्पना, उपाय आणि कृती आमंत्रित करण्यासाठी प्रज्वला चॅलेंज उपक्रम
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या संकल्पना, उपाय आणि कृती आमंत्रित करण्याच्या…
उड्डाणपूलाखालील पडीक जागेचा कायापालट करीत नमुंमपाने केली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची उभारणी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी – शहर स्वच्छतेप्रमाणेच शहर सुशोभिकरणाकडेही नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष…
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा-२०२२,किल्ले रायगडावरुन येणार स्पर्धेची मुख्य क्रीडा ज्योत
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा-२०२२ चे येत्या २ ते १२…
टिटवाळ्यात २८ लाख ७९ हजार रुपयांची वीजचोरी, ५१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी – महावितरणच्या विशेष पथकांनी वीजचोरी उघडकीस आणलेल्या टिटवाळा येथील ५१ जणांविरुद्ध…
मासुंदा तलावात पूर परिस्थितीमधील बचाव कार्याचे प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या आपदा मित्रांच्या पहिल्या तुकडीतील…
मुंबई सीमा शुल्क विभागाने जप्त केलेले ५३८ कोटी रूपयांचे अमंली पदार्थ केले नष्ट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई,मुंबई सीमा शुल्क विभाग -3 च्या वतीने आज नवी मुंबईतील तळोजा येथे असलेल्या मेसर्स मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड (एमडब्ल्यूएमएल) च्या ज्वलन सुविधास्थानी 140.57 किलोंचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 538 कोटी रूपये आहे. या संदर्भात जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचा तपशील देताना, विभाग-3 चे मुख्य आयुक्त, राजेश सानन यांनी सांगितले की, नष्ट केलेली औषधे विभाग -3 अंतर्गत कार्यरत असलेल्या तीन आयुक्तालयांनी जप्त केली आहेत. जप्तीच्या कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे आहे. 1. मुंबई विमानतळ आयुक्तालयाने 14 प्रकरणांमध्ये 56.06 किलो हेरॉईन आणि 33.81 किलो चरस जप्त केला आहे. 2. एअर कार्गो निर्यात आयुक्तालयाकडे दाखल केलेल्या गुन्ह्यात 21.70किलो चरस जप्त केले. 3. डीआरआयने एका प्रकरणात 29 किलो हेरॉईन जप्त केले, तर मुंबई सीमा शुल्क विभाग-3 च्या प्रतिबंधात्मक आयुक्तालयाने हा माल नष्ट केला. सीमाशुल्क कायदा, 1962 च्या तरतुदींनुसार बंदी असलेले अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक म्हणजेच मनावर परिणाम करणारे पदार्थ बाळगणाऱ्या व्यक्ती अवैध कृत्य करीत असल्याचे मानले जाते. अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ (एनडीपीएस) कायदा, 1985 च्या कलम 8 अन्वये गुन्ह्यानुसार दोषी आहेत. तसेच या कायद्यातील कलम 21, कलम 23 आणि एनडीपीएस अधिनियम 1985 मधील कलम 29 नुसार शिक्षेस पात्र आहेत. सीमा शुल्क अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अंमली पदार्थ जप्तीच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की; अंमल पदार्थांची तस्करी प्रामुख्याने केनिया, युगांडा, झांबिया आणि झिम्बाब्वे या देशांतील नागरिकांकडून केली जाते. सामानामध्ये खास यासाठी गुप्त कप्पे बनवून त्यामध्ये हे अंमली पदार्थ लपवून त्यांची तस्करी केली जाते. तसेच प्रवाशानेही अशा पदार्थाचे सेवन केलेले असते, असे आढळले आहे. मुंबई विमानतळ सीमा शुल्क विभागाने अंमली पदार्थांची होणारी अवैध वाहतूक शोधण्यासाठी ‘स्निफर डॉग’चा प्रभावीपणे वापर केला आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थांना जाळून नष्ट करणे आवश्यक असले तरीही ते पर्यावरणाच्या दृष्टीने हानीकारक आहे. त्यामुळे असे पदार्थ जाळून भस्मसात करण्यासाठी प्रमाणित प्रदूषण नियंत्रण उपकरणे बसवलेल्या ’इन्सिनरेटर्स’ मध्ये करणे आवश्यक आहे.