केडीएमसीची अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची कारवाई

नेशन न्युज मराठी टीम.

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार व विभागीय उपायुक्त पल्लवी भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली फ प्रभागाचे सहा. आयुक्त किशोर शेळके यांनी डोंबिवली पूर्व, गोपाळ नगर गल्ली क्र.3, येथील बांधकामधारक जयदीप भागीनाथ त्रिभुवन यांच्या नावे असलेल्या तळ +3 मजल्याचे आर.सी.सी अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई आज सुरु केली. हि निष्कासनाची कारवाई टिळक नगर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी/कर्मचारी, ग प्रभागाच्या सहा. आयुक्त रत्नप्रभा कांबळे व शैलेश मळेकर उप अभियंता बांधकाम, प्रभाग अधिक्षक दिनेश वाघचौरे, महापालिकेचे पोलिस कर्मचारी, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने व 3 ब्रेकर, 1 गॅस कटर यांच्या सहाय्याने करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे विभागीय उपआयुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ह प्रभागाचे सहा. आयुक्त अक्षय गुडधे यांनी डोंबिवली पश्चिम, गणेश नगर येथील, खाडीकिनारी विकासक सचिन भोईर यांच्या तळ+4 मजली आर.सी.सी. इमारतीच्या चालू असलेल्या बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई करण्यास आज प्रारंभ केला. हि निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण विभागाचे कर्मचारी, विष्णुनगर पोलिस स्टेशन पोलिस कर्मचारी,महापालिकेचे पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने व 1 पोकलन, 3 ब्रेकर यांच्या सहाय्याने करण्यात येत आहे.

आय प्रभागातही सहा. आयुक्त संजय साबळे यांनी विभागीय उपआयुक्त बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, आडीवली ढोकळी, येथील विकासक जयेश पटेल यांच्या तळ+4 आर.सी.सी अनधिकृत इमारत निष्कासनाची धडक कारवाई आज सुरू केली. या इमारतीत ऐ,बी,सी,डी असे एकूण चार विंग असून ऐ,बी व सी तळ+4 मजली आहे. डी विंग मध्ये तळ+2 मजली आहे, आज रोजी सदर इमारतीतील डी विंगचे बांधकाम पूर्णपणे जमीदोस्त करण्यात आले आहे. हि निष्कासनाची कारवाई जे प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर, ड प्रभागाच्या सहा. आयुक्त सविता हिले,  अधिक्षक गोवेकर, मानपाडा पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी, महापालिकेचे पोलिस कर्मचारी, अतिक्रमण नियंत्रण विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने व 1 पोकलन, 1 जेसीबी यांच्या सहाय्याने करण्यात येत आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web