वाहतुक नियमांच्या जनजागृतीसाठी कल्याण ट्रॅफिक पोलिसांचा ‘नो चलान डे’ उपक्रम

नेशन न्युज मराठी टीम.

कल्याण – मोटार वाहन रेग्युलेशन २०१९ अन्वये मोटार वाहन कायद्यातील दंडाच्या तरतुदीमध्ये बदल होऊन मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध मोठ्या प्रमाणात दंडाची तरतूद करण्यात आली सदर कायद्यातील अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य सरकारने १ डिसेंबर २०२१ पासून राज्यभर सुरु केली आहे. महाराष्ट्रामध्ये “१ स्टेट १ चलान” या योजनेअंतर्गत फेब्रुवारी २०१९ पासून लेखी चलान बंद होऊन ई-चलान सुरु करण्यात आले आहे. 

वाहतुकीच्या नविन कायद्यांबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासह ते पाळण्याचे आवाहन करण्यासाठी कल्याण ट्रॅफिक पोलिसांतर्फे ‘नो चलान डे’ उपक्रम राबविण्यात आला. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना यावेळी गुलाब पुष्प आणि नव्या वाहतूक नियमांचे पत्रक वाहतूक पोलिसांकडून देण्यात आले.

केंद्र सरकारने काही आठवड्यांपूर्वी वाहतुकीच्या नियम मोडणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ केली आहे. त्यामुळे पूर्वी काही शेमध्ये असणारा दंड आता हजारांच्या घरात पोहचला आहे. त्याजोडीला न्यायालयीन शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. त्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आजचा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती कल्याण ट्रॅफिक एसीपी मंदार धर्माधिकारी यांनी दिली. तसेच आज कल्याण स्टेशन परिसरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना थांबवून वाहतुक पोलिसांनी त्यांचे न केले. एसटी स्टँड, शिवाजी चौक शहजानंद ,सुभाष चौक,दुर्गाडी अशा विविध ठिकाणी तसेच ‘नो चलान डे’ हा केवळ आजच्या दिवसापूरता मर्यादित असून वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांवर उद्यापासून पुन्हा एकदा कडक कारवाई सुरू केली जाणार असल्याचा इशाराही वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी यावेळी दिला.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web