मुंबई विद्यापीठ शूटिंग स्पर्धेत एसएसटी महाविद्यालयच्या कुणाल पांचाळ ची निवड

नेशन न्युज मराठी टीम.

कल्याण – मुंबई विद्यापीठांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी शूटिंग  निवड चाचणी स्पर्धा ही तोलानी महाविद्यालय अंधेरी येथे पार पडली. यात एसएसटी महाविद्यालयच्या कुणाल पांचाळ यास 531 पॉइंट्स घेत पिस्टल या क्रीड़ा प्रकारात मुंबई विद्यापीठ टीम मध्ये निवड करण्यात आली. अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धा ही मानव रचना इंटरनॅशनल विद्यापीठ फरीदाबाद येथे होणार आहे. 
कोविड मुळे मुंबई विद्यापीठ आंतर  महाविद्यालयीन स्पर्धा या वर्षात रद्द करण्यात आल्या आणि निवड चाचणी द्वारे आंतर विद्यापीठ स्पर्धासाठी खेळाडुंची निवड करण्यात आली.राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीय खेळाडुंच्या अत्यंत अतितटीच्या निवड चाचणीत कुणाल ने आपले नाव मुंबई विद्यापीठाच्या टीम मध्ये कोरले.
मुंबई विद्यापीठाचे क्रीड़ा संचालक डॉ. मोहन आमृले यांनी यांचे अभिनंदन केले तसेच एस एस टी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. जे. सी. पुरस्वानी , उपप्राचार्या डॉ. खुशबू पुरस्वानी , उपप्राचार्य जीवन विचारे तसेच क्रीड़ा शिक्षक राहुल अकुल , पुष्कर पवार, मार्गदर्शक अंकित सिंह  यां सर्वांनी सुद्धा  विजेत्या खेळाडुचे अभिनंदन केले आणि फरीदाबाद येथे होणाऱ्या आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी त्याना शुभेच्छा दिल्या.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web