कल्याण कोळसेवाडी पोलिसांच्या प्रसंगावधनाने टळला मोठा अनर्थ

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पूर्वेत काटेमानवली नाका ते चिंचपाडा रोडवरील व्यापाऱ्यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबतचे आवाहन पत्रिकाचे पोलीस वाटप करत होते.यावेळी रस्त्यावर अचानक पणे वाहतूक कोंडी झाल्याने कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे हवालदार प्रवीण देवरे, पोलीस नाईक कुणाल परदेशी, हे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गेले असता.त्याठिकाणी तीन इसम आपापसात भांडण करत असल्याचे त्यांच्या दिसले.त्यातील एक तरुण धारधार शस्त्राने दोन जणांना मारत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले.यावेळी पोलिसांनी चाकू मारत असलेल्या तरुणाला जामिनिवर खाली पाडून त्याच्या हातातला रक्ताने भरलेला चाकू हिसकावून आरोपीस ताब्यात घेतले. जर या दोन्ही पोलीस कर्मचार्यांनी वेळीच आरोपीच्या मुसक्या आवळल्या नसत्या तर एखाद्याला आपला जीव गमवावा लागला असता.

तसेच जखमी झालेले विशाल पाटील व दीपेश रसाळ यांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.जखमी झालेल्या विशाल व दीपेश यांच्या फिर्यादी वरून आरोपी मयूर दराडे याच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास कोळसेवाडी पोलीस करत आहे.या केलेल्या धाडसी कामगिरी मुळे सर्व स्तरातून या पोलीस कर्मचार्यांचे कौतुक होत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनीही पोलीस हवालदार प्रवीण देवरे, पोलीस नाईक कुणाल परदेशी यांचे कौतुक केले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web