कल्याणात ग्राहकाची पार्किगमधून दुचाकी बेपत्ता,मुजोर पार्किग चालकास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याणमध्ये राहणारे अप्पू दत्ता हे मुलूंडमध्ये भूमीअभिलेखा कार्यालयात कामाला आहेत. दररोज ते त्यांची दुचाकी रेल्वे स्टेशनच्या लगतच्या पार्किंगमध्ये उभी करून कामाला जातात. मंगळवारीही त्यांनी त्यांची दुचाकी पार्किगमध्ये उभी करुन कामाला निघून गेले. संध्याकाळी ते कामावर परतले तेव्हा त्यांची दुचाकी पार्किगमध्ये नव्हती. पार्किग चालक महेश शिंदे याला दुचाकी बाबत विचारणा केली असता. तेव्हा शिंदे यांनी तुमच्याकडची पावती कुठे आहे. तेव्हा दत्ता यांनी त्यांची पावती हरवली असून तुमच्या नोंद वाहिमधील नोंद पहावयास सागितले. तेव्हा शिंदे याने त्यांच्या नोंदणी वहीत खाडाखोड करुन नोंदीचा कागद फाडून टाकला. व फिर्यादी यांना आरेरावी करू लागला. त्यामुळे अप्पू दत्ता कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला सर्व प्रकार कथन करत,पार्किंग मालका विरोधात तक्रार नोंदविली.

या बाबत कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मीक शार्दुल यांनी सागितले की, दुचाकी बेपत्ता झाल्यानंतर मालकाने केलेली तक्रार योग्य आहे. भादवी 204 आणि 420 प्रमाणे गुन्हा दाखल केला गेला आहे. पार्किग चालक महेश शिंदे याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पार्किगमध्ये सीसीटीव्ही नाही. तसेच आगीची घटना झाली तर सुरक्षितेची खबरदारी म्हणून कुठलीही व्यवस्था नाही. पार्किग अनधिकृत आहे की, अधिकृत आहे याचाही तपास केला जाईल. बाईक गेली कुठे याचाही शोध घेतला जाईल. पुढील तपास लोहमार्ग पोलीस करत आहेत.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web