डोंबिवलीतील मनीषा हळदणकर बॉडी बिल्डिंग स्पर्धेत मिस नवोदित ठाणे श्री २०२१ ने` सन्मानित

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डींग असोसिएशन सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट आयोजित निवेदित ठाणे श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धा २०२१ मध्ये डोंबिवली पश्चिमेकडील जय हिंद कॉलनी येथील मनीषा हळदणकर यांनी वयाच्या ४७ व्या वर्षी शरीरयष्टी स्पर्धेत मिस नवोदित ठाणे श्री २०२१ किताबाने सन्मानित करण्यात आले. हळदणकर यांचे या क्षेत्रातील पहिले यश असून भविष्यात आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून देशाची मान अधिकाधिक उंचवावी अशी इच्छा आहे.

मनीषा हळदणकर यांनी सुरुवातीला स्पार्टन जिममध्ये आपल्या वजन कमी करण्यासाठी वर्क आऊट केले. हळदणकर यांना आपल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धला या जिममधूनच प्रेरणा मिळाली आणि पुढे त्याच्या स्पर्धेसाठी अथक मेहनत घेण्याचे ठरविले. हळदणकर म्हणाल्या,मी गृहिणी असून बॉडी बिल्डिंग स्पर्धेत जाण्यासाठी पतीची परवानगी घेतली. नंतर खूप मेहनत घेतली.मनीषा हळदणकर हे मागील दोन वर्षापासून स्पार्टन जिमचे प्रशिक्षक श्रीकांत शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.ठाणे डिस्ट्रिक्ट बोडी बिल्डींग असोसिएशन सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट आयोजित निवेदित ठाणे श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धा २०२१ मध्ये मनीषा हळदणकर यांनी शरीरयष्टी स्पर्धेत मिस नवोदित ठाणे श्री २०२१ सन्मानित केल्यावर हळदणकर यांचा आनंद गगनात मावत नव्हता. ठाणे बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या ज्येष्ठ पदाधिकारी व व सेंट्रेल रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व ज्येष्ठ खेळाडू उपस्थित होते.सामाजिक कार्यकर्ते शाम गौड, जिम संचालक सुनील पवा, परिमल देसले, मनिषा पवार, तसेच नागरिकांकडून भरभरून कौतुक केले

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web