कल्याणात काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – एकीकडे वाढती महागाई ,पेट्रोल डिझेलच्या गगनाला भिडत जात असलेल्या किंमतीने देशभरात मोदी सरकारला सत्ते पासून खाली खेचण्यासाठी कॉग्रेस पक्षाने रान पेटवले असताना मात्र दुसरी कडे काँग्रेस पक्षातील पदाधिकार्याच्या अंतर्गत वादाची ठिणगी कल्याण कॉग्रेस मध्ये पडलेली दिसून आली आहे.रविवारी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कल्याणातील दौऱ्या दरम्यान काँग्रेस पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्षासह अन्य पदाधिकाऱ्यानी कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या विरोधात घोषणा देत पोटे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली काँग्रेस पक्षाच्या पदधिकारी व कार्यकर्त्याच्या आक्रमक भूमिके मुळे पक्षातील अंतर्गत वाद चांगलाच विकोपाला गेला असल्याचे दिसून येत आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web