महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षणाचे सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्ली/प्रतिनिधी – महाराष्ट्राला सर्वाधिक स्वच्छ सर्वेक्षण वर्ष 2021 चे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.  सांगली जिल्ह्यांतील विटा नगरपालिकेला देशात प्रथम क्रमाकांचा तर पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि सासवड ने दुसरा व तीसरा क्रमांक प्राप्त करून देशात स्वच्छ सर्वेक्षणाचे सलग तीन पुरस्कार पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. या तीन नगरपालिकांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आलेले आहे. यासह महाराष्ट्राने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात दुसरा क्रमांक मिळविला आहे.

आज विज्ञान भवन येथे केंद्रीय गृहनिर्माण तथा नगर विकास मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण-2021 चे राष्ट्रीय पुरस्कार  वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती राम नाथ कोविंद, केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास मंत्री हरदिप सिंग पुरी, केंद्रिय गृहनिर्माण तथा नगरविकास राज्यमंत्री कौशल किशोर, छत्तीसगड़ राज्याचे मुख्यमंत्री, मनीपुर राज्याचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास सचिव दुर्गा प्रसाद मिश्रा हे मंचावर उपस्थित होते.

राष्ट्रीय स्तवरावरील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांना, नगरपालिकांना, लष्करी छावण्यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.  तर इतर पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री पुरी यांच्या हस्ते वितरित करून गौरविण्यात आले.  तसेच  केंद्रीय राज्य मंत्री श्री. कौशल यांच्या हस्तेही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

आज झालेल्या पुरस्कार वितरणामध्ये एकूण पुरस्काराच्या 40 टक्के पुरस्कार महाराष्ट्राला मिळालेले आहेत.   वन स्टार मानांकनामध्ये देशभरातील एकूण 147 शहरांचा समावेश आहे. यामध्ये राज्यातील 55 शहरे आहेत. थ्री स्टार मानांकनामध्ये देशभरातील एकूण 143 शहरे आहेत त्यात महाराष्ट्रातील 64 शहरांचा समावेश आहे. फाईव स्टार मानांकनामध्ये देशभरातील 9 शहरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यामध्ये राज्यातील नवी मुंबई या शहराचा समावेश आहे. नवी मुंबई महानगरपालिकेला 6 कोटी रूपयांचा धनादेश बक्ष‍िस स्वरूपात प्रदान करण्यात आला. दहा लाख लोकसंख्यावरील शहरांमध्ये देशभरातील एकूण 48 शहारांची निवड करण्यात आली होती त्यात राज्यातील 10 शहरांचा समावेश आहे. एक ते दहा लाख लोकसंख्या असणाऱ्‍या 100 शहरांमध्ये  राज्यातील 27 शहरांचा समावेश आहे. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्‍या 100 शहरांमध्ये राज्यातील 56 शहरे आहेत तसेच यामध्ये पहिले वीस शहरे ही महाराष्ट्राचीच आहेत. या एकूण स्वच्छ सर्वेक्षणाच्या कामगिरीसाठी राज्याला देशातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार केंद्रिय मंत्री श्री पुरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार राज्याचे नगर विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी स्वीकारला त्यांच्यासोबत राज्य स्वच्छ मिशन (नागरी)चे अभियान संचालक अनिल मुळे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

पुरस्कार प्राप्त शहरे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत यांची यादी सोबत जोडलेली आहे.

  • अमृत -“स्वच्छ शहर” पुरस्कार
  • नवीमुंबई २) पुणे ३) बृहन्मुंबई ४ ) पनवेल
  • नॉनअमृत -“स्वच्छ शहर” पुरस्कार
अनु. क्रनगरपरिषद/ नगरपंचायतअनु. क्रनगरपरिषद/ नगरपंचायत
विटा नगरपरिषद१०तिवसा नगरपंचायत
लोणावळा नगरपरिषद११पन्हाळा नगरपरिषद
सासवड  नगरपरिषद१२मुरगुड नगरपरिषद
कराड नगरपरिषद१३धानोरा नगरपंचायत
हिंगोली नगरपरिषद१४भद्रावती नगरपरिषद
देवळाली – प्रवरा नगरपरिषद१५मूल नगरपरिषद
खोपोली नगरपरिषद१६दोंडाईचा – वरवाडे नगरपरिषद
कामठी नगरपरिषद१७खानापूर नगरपंचायत
पांचगणी-गिरीस्थान नगरपरिषद
  • अमृत -“कचरामुक्त शहरांचे प्रमाण‍ित 3 स्टार मानांकन ” पुरस्कार
अनु. क्रनगरपरिषद/ नगरपंचायतअनु. क्रनगरपरिषद/ नगरपंचायत
लातूर महानगरपालिकाअहमदनगर
महानगरपालिका
कुळगांव-बदलापुर  नगरपरिषदधुळे
महानगरपालिका
नवी मुंबईमहानगरपालिकाजळगांव
महानगरपालिका
पनवेल महानगरपालिका१०पुणे
महानगरपालिका
ठाणे
महानगरपालिका
११सातारा नगरपरिषद
चंद्रपूर
महानगरपालिका

नॉनअमृत -“कचरामुक्त शहरांचे प्रमाणित 3 स्टार मानांकन ” पुरस्कार

अनु. क्रनगरपरिषद/ नगरपंचायतअनु. क्रनगरपरिषद/ नगरपंचायत
शेंदूरजनाघाट नगरपरिषद३०सेलू नगरपंचायत
तिवसा नगरपंचायत३१उमरेड नगरपरिषद
घनसांवगी नगरपंचायत३२बोधवड नगरपरिषद
हिंगोली नगरपरिषद३३देवळाली – प्रवरा नगरपरिषद
जाफराबाद नगरपंचायत३४एरंडोल नगरपरिषद
मानवत नगरपरिषद३५शिर्डी नगरपंचायत
नायगाव नगरपंचायत३६शिरपूर – वरवाडे नगरपरिषद
पाथरी नगरपरिषद३७सिन्नर नगरपरिषद
सेलू नगरपरिषद३८यावल नगरपरिषद
१०सिल्लोड नगरपरिषद३९आष्टा नगरपरिषद
११कर्जत नगरपरिषद४०गडहिंग्लज नगरपरिषद
१२खेड नगरपरिषद४१इंदापूर नगरपरिषद
१३खोपोली नगरपरिषद४२जेजूरी नगरपरिषद
१४मुरबाड नगरपंचायत४३जुन्नर नगरपरिषद
१५शहापूर नगरपंचायत४४कराड नगरपरिषद
१६बल्लारपूर नगरपरिषद४५कुरूंदवाड नगरपरिषद
१७भामरागड नगरपंचायत४६लोणावळा नगरपरिषद
१८ब्रम्हपुरी नगरपरिषद४७महाबळेश्वर- गिरीस्थान नगरपरिषद
१९देसाईगंज नगरपरिषद४८मलकापूर नगरपरिषद
२०धानोरा नगरपंचायत४९मंगळवेढा नगरपरिषद
२१कामठी नगरपरिषद५०मुरगुड नगरपरिषद
२२काटोल नगरपरिषद५१पांचगणी-गिरीस्थान नगरपरिषद
२३खापा नगरपरिषद५२पन्हाळा नगरपरिषद
२४कोरपना नगरपंचायत५३रहिमतपूर नगरपरिषद
२५महादुला नगरपंचायत५४सासवड  नगरपरिषद
२६मौदा नगरपंचायत५५शिरूर  नगरपरिषद
२७मोवाड नगरपरिषद५६वडगांव नगरपरिषद
२८नरखेड नगरपरिषद५७विटा नगरपरिषद
२९सावली नगरपंचायत५८वाई नगरपरिषद
Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web